रेमल’चे बांगला देशमध्ये थैमान : १० ठार, ३० हजार घरे उद्‍ध्‍वस्‍त

पुढारी ऑनलाईन डेस्क : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या रेमल चक्रीवादळाने बांगला देशमध्ये हाहाकार उडवला आहे. रविवारी (दि.२७) मध्यरात्री (Cyclone Remal) हे वादळ पश्चिम बंगाल आणि बांगला देशच्या किनारपट्टीवर धडकण्यास सुरूवात केली. पश्चिम बंगालमध्ये २ जण तर बांगलादेशात १० जण ठार झालेत. या संदर्भातील वृत्त‘Ndtv’ने दिले आहे. रेमल चक्रीवादळामुळे बांगलादेशात सखल भागात चक्रीवादळ धडकले. या नैसर्गिक …
रेमल’चे बांगला देशमध्ये थैमान : १० ठार, ३० हजार घरे उद्‍ध्‍वस्‍त


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या रेमल चक्रीवादळाने बांगला देशमध्ये हाहाकार उडवला आहे. रविवारी (दि.२७) मध्यरात्री (Cyclone Remal) हे वादळ पश्चिम बंगाल आणि बांगला देशच्या किनारपट्टीवर धडकण्यास सुरूवात केली. पश्चिम बंगालमध्ये २ जण तर बांगलादेशात १० जण ठार झालेत. या संदर्भातील वृत्त‘Ndtv’ने दिले आहे.
रेमल चक्रीवादळामुळे बांगलादेशात सखल भागात चक्रीवादळ धडकले. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत १० लोकांचा मृत्यू झाला आहे. यामधील बहुतांश लोक भिंती काेसळून झालेल्‍या दुर्घटनांमध्‍ये मृत्‍युमुखी पडले आहेत. यामध्ये सात लोकांचा समावेश आहे. तर इतर तीन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. चक्रीवादळात 30,000 हून अधिक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. हजारांपेक्षा अधिक लोकांचे मोठे नुकसान (Cyclone Remal) झाले आहे, असे उच्च स्थानिक अधिकाऱ्यांनी आज (दि.२७) सांगितले.
ताशी १३५ किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह तीव्र चक्रीवादळ ‘रेमल’ बांगलादेश आणि लगतच्या पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर रविवारी रात्री धडकले. या चक्रीवादळाच्या तडाख्याने बंगालमध्ये हाहाकार उडाला आहे. यामुळे मुसळधार पाऊस पडत असून अनेक भागात मोठ्या प्रमाणात पडझड (Cyclone Remal) झाली आहे.

Three dead as cyclone batters Bangladesh and India.
Around a million people in Bangladesh and neighbouring India fled inland to shelter from the stormhttps://t.co/SBhcbRjwrS pic.twitter.com/9jTdaLUSSe
— AFP News Agency (@AFP) May 27, 2024

हेही वाचा:

Cyclone Remal : चक्रीवादळाला नाव कसे देतात? ‘रेमल’चा नेमका अर्थ तरी काय?
Cyclone Remal Updates | ‘रेमल’ने हाहाकार, पश्चिम बंगालमध्ये दोघांचा मृत्यू
Cyclone Remal Update : ‘रेमल’ चक्रीवादळ बंगालच्या किनारपट्टीवर धडकले; मान्सूनची दुसरी शाखा सक्रिय

Go to Source