न्‍यायालयात स्वाती मालीवालांच्‍या अश्रूंचा बांध फुटला

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :  दिल्‍लीतील तीस हजारी न्‍यायालयात बिभव कुमार यांच्‍य जामीन अर्जावरील सुनावणीवेळी आज स्‍वाती मालीवाल यांना आपल्‍या अश्रूला वाट करुन दिली.  त्‍या धाय माकलून रडल्‍या. यावेळी दिल्लीच्या माजी महिला आयोगाच्या अध्यक्षांनी तीस हजारी न्यायालयात सांगितले की, “बिभव कुमारला जामीन मंजूर झाला तर “माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे”. दरम्‍यान, स्वाती मालीवाल मारहाण …

न्‍यायालयात स्वाती मालीवालांच्‍या अश्रूंचा बांध फुटला

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क :  दिल्‍लीतील तीस हजारी न्‍यायालयात बिभव कुमार यांच्‍य जामीन अर्जावरील सुनावणीवेळी आज स्‍वाती मालीवाल यांना आपल्‍या अश्रूला वाट करुन दिली.  त्‍या धाय माकलून रडल्‍या. यावेळी दिल्लीच्या माजी महिला आयोगाच्या अध्यक्षांनी तीस हजारी न्यायालयात सांगितले की, “बिभव कुमारला जामीन मंजूर झाला तर “माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे”. दरम्‍यान, स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणी न्यायालयाने बिभव कुमारच्या जामिनावर निर्णय राखून ठेवला आहे.
अरविंद केजरीवाल यांचे खासगी स्‍वीय सहायक बिभव कुमार यांनी स्‍वाती मालिवाल यांना १३ रोजी हल्‍ला केल्‍याचा आरोप आहे. बिभव कुमार यांची न्यायालयीन कोठडी मंगळवारी संपणार आहे.

Swati Maliwal assault case: The court reserves the order on bail of Bibhav Kumar
— ANI (@ANI) May 27, 2024

आजच्‍या सुनावणीत बिभव कुमार यांच्‍या वकिलांनी युक्‍तीवाद केला की, “हे सर्व पूर्वनियोजित होते.कोणत्याही कारणास्तव मला बदनाम करण्यासाठी माझ्यावर खोटे आरोप करण्‍यात आले आहे. जेथे मारहाण झाल्‍याचा दावा केला जात आहे येथे ड्रॉईंग रूम (केजरीवाल यांच्या निवासस्थानी) कोणत्याही सीसीटीव्हीने कव्हर केलेली नव्हती. म्हणूनच स्‍वाती मालीवाल यांनी या ठिकाणी आपल्‍याला मारहाण झाल्‍याचा दावा केला आहे. तिथे सीसीटीव्ही नसल्‍याने हा दावा केला जात आहे, असाही दावा त्‍यांनी केला. यानंतर न्‍यायालयाने बिभव कुमार यांच्‍या जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला.

#WATCH | AAP MP Swati Maliwal leaves from Delhi’s Tis Hazari court after attending Bibhav Kumar’s bail hearing
The order on the bail plea has been reserved. pic.twitter.com/9aPJNrhUHR
— ANI (@ANI) May 27, 2024