इस्रायलचा रफाहवर हवाई हल्ला, ३५ पॅलेस्टिनींसह हमास कमांडर ठार
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : इस्त्रायली सैन्याने दक्षिण गाझा पट्टीतील इजिप्तच्या सीमेला लागून असलेल्या रफाह शहरात रविवारी ( दि.२६ मे) मोठी लष्करी कारवाई केली. या हल्ल्यात हमासचा कमांडरचा खात्मा केल्याचा दावा इस्रायल सैन्य दलाने (IDF) ने सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म Xवरुन केला आहे. तर या हल्ल्यात 35 पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले तर १२ हून अधिक जण जखमी झाल्याचे पॅलेस्टिनी आपत्कालीन सेवा विभागाने म्हटलं आहे.
रफाहमध्ये हमासचे मोठे लष्करी तळ आहे, असा दावा इस्त्रायलने यापूर्वीच केला हाेता. रफाहमध्ये हमासच्या चार लढाऊ बटालियनअसल्याचे सांगत राफाहमध्ये मोठी कारवाई केली जाईल, असा इशारा इस्त्रालयने दिला होता. पॅलेस्टिनी आरोग्य आणि नागरी आपत्कालीन सेवा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी इस्रायलने केलेल्या हल्ल्यात रफाह शहरात किमान 35 पॅलेस्टिनी ठार झाले आणि १२ हून अधिक जण जखमी झाले आहेत. रफाहमध्ये शेकडो विस्थापित पॅलेस्टिनींचे वास्तव्य आहे. हमासने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्त्रायलवर हल्ला केला होता. याला इस्रायलने जोरदार प्रतित्त्युर दिले. यानंतर शेकडे पॅलेस्टिनी नागरिकांनी गाझाच्या उत्तरेकडील भागातून आश्रय घेतला आहे.
Eliminated in the precise airstrike in northwest Rafah: Hamas Chief of Staff in Judea and Samaria and an additional senior Hamas official.
Terrorist #1: Yassin Rabia
Rabia managed the entirety of Hamas’ terrorist activity in Judea and Samaria, transferred funds to terrorist… https://t.co/iaGrw8WJ4f
— Israel Defense Forces (@IDF) May 26, 2024
इस्त्रायल सैन्य दलाने (IDF) X वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, रफाहमध्ये हमासचे दहशतवादींचे वास्तव्य असणार्यावर इमारतीवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यांमध्ये हमासचा वेस्ट बँकचा चीफ ऑफ स्टाफ आणि पॅलेस्टिनी इस्लामी गटाचा कंमाडर ठार झाला आहे.
आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशानंतर दोन दिवसांनी रफाहवर हल्ला
आंतरराष्ट्रीय न्यायालय (ICJ) ने इस्रायलला गाझा शहरातील “तत्काळ लष्करी आक्रमण थांबवण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर दोनच दिवसांनी इस्रायलने रफाह वर हल्ला केला आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने म्हटले आहे की, फाहमधील लष्करी कारवाई सुरू राहिल्यास ते आणखी तीव्र होईल.
गाझामध्ये युद्धविरामासाठी हमास आणि इस्रायल यांच्यातील चर्चा आठवडे थांबली आहे. तथापि, इस्त्रायल आणि अमेरिकेच्या गुप्तचर अधिकारी आणि कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान बिन जस्सिम अल थानी यांच्यातील बैठकीनंतर या आठवड्याच्या शेवटी हालचाली होण्याची काही चिन्हे आहेत. इजिप्शियन आणि कतारी मध्यस्थांच्या ताज्या प्रस्तावांवर आधारित चर्चा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये अमेरिकेच्या सक्रिय सहभाग आहे, असे एका अधिकाऱ्याने वृत्तसंस्था रॉयटर्सला सांगितले.
हेही वाचा :
‘आम्ही तुम्हाला गोळ्या घालू…’ : इस्त्रायलकडून हमासचा ‘तो’ व्हिडिओ शेअर
‘गाझा’तून माघार घेणार नाही : इस्रायलच्या पंतप्रधानांनी हमासचा प्रस्ताव फेटाळला
Israel-Gaza war : इस्रायलचा गाझावर हवाई हल्ला; हमासच्या प्रमुख नेत्याच्या तीन मुलांचा मृत्यू