मालेगाव गोळीबारच्या घटनेने हादरले; पेट्रोलपंप चालकांमध्ये भिती

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा – तालुक्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील झोडगे गावाजवळ असलेल्या पेट्रोलपंपावर दोन अज्ञात व्यक्तींनी लुटीच्या उद्देशाने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. २५) रात्री उशिरा घडली. या घटनेने झोडगे परिसरात खळबळ उडाली असून महामार्गावरील पेट्रोलपंप व हॉटेल चालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यावेळी पोलिसांनी महामार्गावर गस्त वाढवत गुन्हेगारांना अटकाव करावा अशी मागणी व्यावसायिकांकडून …

मालेगाव गोळीबारच्या घटनेने हादरले; पेट्रोलपंप चालकांमध्ये भिती

मालेगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा – तालुक्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील झोडगे गावाजवळ असलेल्या पेट्रोलपंपावर दोन अज्ञात व्यक्तींनी लुटीच्या उद्देशाने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. २५) रात्री उशिरा घडली. या घटनेने झोडगे परिसरात खळबळ उडाली असून महामार्गावरील पेट्रोलपंप व हॉटेल चालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यावेळी पोलिसांनी महामार्गावर गस्त वाढवत गुन्हेगारांना अटकाव करावा अशी मागणी व्यावसायिकांकडून केली जात आहे.
झोडगे गावाजवळील कृष्णा पेट्रोलपंपावर शनिवारी रात्रीच्या सुमारास दोन अनोळखी तरुण विनानंबरप्लेट असलेल्या दुचाकीवरून आले. यातील एकाने पेट्रोलपंपावरील कर्मचारी राजेंद्र पाटकर (रा. आर्वी, जि. धुळे) याला शिवीगाळ करीत मारहाण केली. यावेळी दुसरे कर्मचारी भरत बच्छाव (रा. भिलकोट) हे धावून गेले असता, संशयित तरुणाने खिशातून बंदूक काढून दोनवेळा हवेत गोळीबार केला. नागरिक पेट्रोलपंपाकडे येत असल्याचे लक्षात येताच संशयित तरुणांनी भरत यांच्या खिशातील सात हजार रुपये किमतीचा मोबाइल फोन काढून घेत धुळ्याच्या दिशेने पळ काढला.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संशयितांचा शोध घेतला. परंतु ते फरार झाले. दरम्यान त्यांनी चोरून नेलेला मोबाइल फोन महामार्गावर सापडला. हा घटनाक्रम पेट्रोलपंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी तपासासाठी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. भरत बच्छाव यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दोन संशयितांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा:

Malegaon Fire News | धक्कादायक! मालेगावात माजी महापौरावर गोळीबार
Nashik | आपत्ती निवारणासाठी जिल्हा व्यवस्थापन सज्ज; आठ रबरी बोट्स दाखल