पुणे : भिडेवाडा स्मारकासाठी तीन आराखडे तयार
पुणे : भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक साकारण्यासाठी महापालिकेने वास्तुविशारदांकडून (आर्किटेक्ट) आराखडे मागविले असून, पालिका प्रशासनाकडे पुण्यातील तीन नामवंत वास्तुविशारदांनी महापालिकेला आराखडे सादर केले आहेत. यामधून एका आराखड्याची निवड करण्यात येणार आहे. दरम्यान, जागा सोडण्यासाठी आणखी मुदतवाढ मिळावी, यासाठी भिडेवाड्यातील भाडेकरूंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1848 मध्ये बुधवार पेठेतील भिडेवाड्यामध्ये देशातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. फुले दाम्पत्यांच्या या कार्यास अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या आठवणी जपण्यासाठी म्हणून भिडेवाडा हा राष्ट्रीय स्मारक झाले पाहिजे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. यासंदर्भात अनेकवेळा मोर्चे-आंदोलने झालेली आहेत. त्यानुसार महापालिकेच्या मुख्य सभेने 2008 मध्ये हा वाडा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला.
याविरोधातील न्यायालयीन लढा 13 वर्षांनंतर महापालिकेने उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात जिंकला. ही जागा एका महिन्यात ताब्यात घेण्याचे आदेशही दिले आहेत. त्यानंतर महापालिकेने वास्तुविशारदांकडून स्मारकाचे आराखडे मागविले होते. त्यानुसार तीन नामवंत वास्तुविशारदांनी महापालिकेला आराखडे सादर केले आहेत. सादरीकरणानंतर त्यातील एका आराखड्याची निवड केली जाणार आहे, असे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.
हेही वाचा
Pune : पारगाव पोलिसांची अवैध धंद्यांवर कारवाई
Pune : सोमेश्वर कारखान्याची पहिली उचल 3 हजार
तुला पळवून नेईन ! पतीसमोरच विवाहितेला धमकी
The post पुणे : भिडेवाडा स्मारकासाठी तीन आराखडे तयार appeared first on पुढारी.
पुणे : भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक साकारण्यासाठी महापालिकेने वास्तुविशारदांकडून (आर्किटेक्ट) आराखडे मागविले असून, पालिका प्रशासनाकडे पुण्यातील तीन नामवंत वास्तुविशारदांनी महापालिकेला आराखडे सादर केले आहेत. यामधून एका आराखड्याची निवड करण्यात येणार आहे. दरम्यान, जागा सोडण्यासाठी आणखी मुदतवाढ मिळावी, यासाठी भिडेवाड्यातील भाडेकरूंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1848 मध्ये बुधवार पेठेतील …
The post पुणे : भिडेवाडा स्मारकासाठी तीन आराखडे तयार appeared first on पुढारी.