अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार- पुणे पोलीस

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या पोर्शे कार अपघातात रोज नवीन खुलासे समोर येत आहेत. अल्पवयीन आरोपी मुलांच्या रिपोर्टमध्ये फेरफार झाल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला आहे. याच्या आधारे ससून हॉस्पिटलमधील २ पोलिसांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांकडून आज (दि.२७) आयोजित पत्रकार परिषदेत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली. पुणे पोलिस …

अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार- पुणे पोलीस

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या पोर्शे कार अपघातात रोज नवीन खुलासे समोर येत आहेत. अल्पवयीन आरोपी मुलांच्या रिपोर्टमध्ये फेरफार झाल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला आहे. याच्या आधारे ससून हॉस्पिटलमधील २ पोलिसांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांकडून आज (दि.२७) आयोजित पत्रकार परिषदेत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली.
पुणे पोलिस आयुक्त यांनी पुणे पोर्शे अपघात प्रकरणात माहिती देताना म्हटले आहे की, रिपोर्टमध्ये फेरफार झाल्याचे पुणे पोलिसांच्या लक्षात आले. याआधारेच ससून हॉस्पिटलमधील फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि ससूनमधील मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. श्रीहरी हरनोर यांना अटक करण्यात आली. यामधील तावरेंनी ब्लड रिपोर्ट बदलले तर डॉ. श्रीहरी हरनोर रक्ताचे नमुने बदलले असल्याची माहितीदेखील उघड करण्यात आली. त्यामुळे पुढील तपासात ससून रुग्णालयाचे सगळे सीसीटीव्ही तपासणार असल्याचही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

Pune car accident case | Pune Police Commissioner Amitesh Kumar says “On 19th May, at around 11 am the blood sample which was taken at Sassoon Hospital was thrown in a dustbin of the hospital and the blood sample of another person was taken and sent to the forensic lab…CMO… pic.twitter.com/PzGBNx1okH
— ANI (@ANI) May 27, 2024

या प्रकरणात 19 मे रोजी सकाळी 11 वाजता अल्पवयीन आरोपीचे ससून हॉस्पिटलमध्ये घेतलेले रक्ताचे नमुने हॉस्पिटलच्या डस्टबिनमध्ये टाकण्यात आले. आणि दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताचे नमुने घेऊन ते फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले. या संबंधित विशाल अगरवाल यांचा डॉ. अजय तावरे यांच्याशी संपर्क झाल्याचेदेखील तपासात उघड झाले आहे. असा खळबळजनक दावा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, “आज दोन्ही आरोपींना पोलिस कोठडीसाठी कोर्टात हजर केले जाईल. ससून हॉस्पिटलच्या सीसीटीव्हीचा डीव्हीआर जप्त करण्यात आला आहे. डॉक्टरांना खोटे बोलणे आणि पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. कलम 120 ब या डॉक्टरांच्या विरोधात 467 आणि 201 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाची केस कलम ३०४ अंतर्गत सुरू आहे. आतापर्यंत अल्पवयीन मुलगा, त्याचे वडील आणि आजोबांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरू असून, यामधील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
हेही वाचा:

Pune Porsche Car Accident | पुणे पोर्शे अपघात: अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनंतर, आजोबाही संशयाच्या भोवऱ्यात
pune porsche accident : अनेक ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण
Pune porsche accident : ‘माझा बाप बिल्डर असता तर..!’ युवक  काँग्रेसकडून निबंध स्पर्धा