आता हिरा तयार होणार 15 मिनिटांत?

सेऊल : जगातील सर्वात महागडे रत्न म्हणजे हिरा. साहजिकच हिर्‍यापासून बनवलेल्या दागिन्यांच्या किमतीदेखील अन्य सर्व दागिन्यांच्या तुलनेत अधिकच असतात. नैसर्गिकरीत्या हिरे तयार होण्याची एक विशिष्ट प्रक्रिया असते. कार्बन अणूंचे हिर्‍यात रूपांतर होण्यासाठी कित्येक गिगापास्कल्सचा प्रचंड दाब आणि हजारो वर्षांतील 1500 अंश सेल्सिअसची तीव्र उष्णता लागते. म्हणूनच बहुतांशी हिरे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या शेकडो मैल खाली गाडलेले आढळतात. …

आता हिरा तयार होणार 15 मिनिटांत?

सेऊल : जगातील सर्वात महागडे रत्न म्हणजे हिरा. साहजिकच हिर्‍यापासून बनवलेल्या दागिन्यांच्या किमतीदेखील अन्य सर्व दागिन्यांच्या तुलनेत अधिकच असतात. नैसर्गिकरीत्या हिरे तयार होण्याची एक विशिष्ट प्रक्रिया असते. कार्बन अणूंचे हिर्‍यात रूपांतर होण्यासाठी कित्येक गिगापास्कल्सचा प्रचंड दाब आणि हजारो वर्षांतील 1500 अंश सेल्सिअसची तीव्र उष्णता लागते. म्हणूनच बहुतांशी हिरे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या शेकडो मैल खाली गाडलेले आढळतात. पण, उच्च दाब आणि उच्च तापमानाची गरज न लागता 15 मिनिटांत जमिनीच्या पृष्ठभागावर म्हणजे प्रयोगशाळेत हिरे तयार झाले, तर तो चमत्कारच असणार आहे. शास्त्रज्ञांनी सध्या असे तंत्रज्ञान विकसित केले आहे, ज्या माध्यमातून येत्या काही वर्षांत सिंथेटिक हिरे उद्योगात क्रांती घडवू शकतात.
दक्षिण कोरियातील इन्स्टिट्यूट फॉर बेसिक सायन्समधील भौतिक रसायनशास्त्रज्ञ (फिजिकल केमिस्ट) रॉडनी रुफ यांनी नेचर जर्नलमध्ये हा रिसर्च प्रकाशित केला आहे. आजपर्यंत 99 टक्के सिंथेटिक हिरे उच्च-दाब आणि उच्च-तापमान (एचपीएचटी) पद्धतीने बनवले गेले. या प्रक्रियेत कार्बन अणूंचे एका लहान बीजाभोवती किंवा स्टार्टेड डायमंडमध्ये (प्राथमिक अवस्थेतील हिरा) रूपांतर करण्यासाठी टोकाची परिस्थिती वापरली जाते. या पद्धतीत दोन उणिवा आहेत. या प्रक्रियेला बराच वेळ लागतो. जवळजवळ दोन आठवड्यानंतर हिरा तयार होते. शिवाय त्याची देखभाल करणेदेखील कठीण असते.
या नव्या प्रक्रियेत नवीन पद्धतीसाठी वातावरणाचा दाब गरजेचा आहे आणि केवळ 15 मिनिटांत हिरा तयार होऊ शकतो. संशोधकांनी ग्रॅफाईट क्रूसिबलमध्ये सिलिकॉनसह इलेक्ट्रिकली गरम केलेले गॅलियम वापरले. समुद्रसपाटीच्या वातावरणाचा दाब असलेल्या चेंबरमध्ये क्रूसिबल ठेवले गेले. बर्‍याच प्रयोगांनंतर त्यांना आढळले की, गॅलियम-निकेल-लोह मिश्रण आणि चिमूटभर सिलिकॉनसह हिरे तयार करण्यासाठी केवळ 15 मिनिटांत सर्वात आदर्श परिस्थिती निर्माण करता येते.