निवडणूक निकालाआधीच शेअर बाजाराची विक्रमी घोडदौड
निवडणुकीचे निकाल लागण्याआधीच भारतीय भांडवल बाजाराची विक्रमी घोडदौड सुरू. निफ्टी आणि सेन्सेक्सने अनुक्रमे शुक्रवारच्या सत्रात 23026.4 आणि 75636.5 अंकांचा विक्रमी अत्युच्च पातळीचा (ङळषश ढळाश हळसह) टप्पा गाठला. दिवसाअखेर किरकोळ पडझडीसह निफ्टी 2257.1 अंक व 75410.39 अंकांच्या पातळीवर बंदभाव दिला. एकूण सप्ताहाचा विचार करता, गत सप्ताहात निफ्टीमध्ये 2.02 टक्के म्हणजेच 22957.1 अंक व सेन्सेक्समध्ये 1.9 टक्के म्हणेच 1404.45 अंकांची वाढ नोंदवली गेली. गत सप्ताहादरम्यान सर्वाधिक वाढ होणार्या समभागांमध्ये अदानी एंटरप्राईझेस (10.6 टक्के), कोल इंडिया (6.5 टक्के), सिप्ला (6.3 टक्के), अदानी पोर्टस (6 टक्के), डिव्हीज लॅब (5.4 टक्के) या समभागांचा समावेश झाला, तर सर्वाधिक घट होणार्या कंपन्यांमध्ये सनफार्मा (-2.9 टक्के), एचडीएफसी लाईफ (-0.9 टक्के), अपोलो हॉस्पीटल्स (-0.7 टक्के) या समभागांचा समावेश झाला.
रिझर्व्ह बँकेकडून केंद्र सरकारला विक्रमी लाभांश जाहीर. आर्थिक वर्ष 2023-24 साठी रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला तब्बल 2 लाख 10 हजार कोटी रुपये लाभांश स्वरूपात हस्तांतरित करण्यात आले. केंद्र सरकारच्या बजेटमधील अंदाजानुसार, या वर्षात लाभांश स्वरूपात रिझर्व्ह बँकेकडून केवळ 1 लाख 2 हजार कोटींच्या रकमेची अपेक्षा/अंदाज जाहीर करण्यात आला होता; परंतु रिझर्व्ह बँकेने दुपटीपेक्षा अधिक लाभांश केंद्र सरकारला दिला. मागील वर्षी रिझर्व्ह बँकेकडून केंद्र सरकारला 87416 कोटी रुपये लाभांश स्वरूपात दिले होते.
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई)चे भांडवल बाजारमूल्य तब्बल पाच लाख कोटी डॉलर्स पार गेले. केवळ सहा महिन्यांत भांडवल बाजारमूल्यात 1 लाख कोटी डॉलर्सची भर पडली. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे (एनएसई) भांडवल बाजारमूल्यदेखील 4 लाख 95 हजार कोटी डॉलर्सच्या जवळपास आहे. भारतातील भांडवल बाजार हा जगातील पाचव्या क्रमांकाचा सर्वात मोठा भांडवल बाजार बनला आहे. अमेरिका, चीन, जपान, हाँगकाँग येथील भांडवल बाजारानंतर भारताचा क्रमांक लागतो. सध्या हाँगकाँगच्या भांडवल बाजाराचे मूल्य 5 लाख 39 हजार कोटी डॉलर्सच्या जवळपास आहे. बीएसईने जर अशीच घोडदौड कायम ठेवली, तर भारतीय भांडवल बाजाराला जगात चौथ्या क्रमांकावर पोहोचणे कठीण नाही, असे विश्लेषकांचे मत आहे. बीएसईने 2 लाख कोटी डॉलर्सचा टप्पा, जुलै 2017 मध्ये चार वर्षांनी म्हणजेच मे 2021 मध्ये 3 लाख कोटी डॉलर्सचा टप्पा, त्यानंतर 29 नोव्हेंबर 2023 मध्ये 4 लाख कोटी डॉलर्सचा टप्पा पार केला होता.
24 जूनपासून ‘अदानी पोर्टस्’ कंपनीचा समावेश सेन्सेक्स निर्देशांकामध्ये केला जाणार. सेन्सेक्स निर्देशांकामध्ये समाविष्ट होणारी अदानी समूहाची ही पहिलीच कंपनी ठरली. सेन्सेक्स निर्देशांकामध्ये देशातील पहिल्या 30 मोठ्या कंपन्यांचा समावेश होतो. अदानी पोर्टस् कंपनीच्या बदल्यात विप्रो आयटी कंपनी सेन्सेक्समधून बाहेर पडणार आहे. मागील वर्षी हिंडेनबर्ग या परदेशी संस्थेच्या अहवालानंतर अदानी समूहाचे समभाग जोरदार कोसळले होते; परंतु वर्षभरातच अदानी एंटरप्राईझेस समभागाने नुकसान भरून काढून मागील वर्षभरातील 3456.25 या सर्वोच्च पातळीला गवसणी घातली.
गुगल या आंतरराष्ट्रीय कंपनीने ‘फ्लीपकार्ट कंपनी’मध्ये 350 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 2900 कोटी रुपये) गुंतवणूक केली. यावेळी फ्लीपकार्टचे एकूण मूल्य (तरर्श्रीरींळेप) 36 अब्ज डॉलर्स इतके ठरवण्यात आले. या आधी हे मूल्य 33 अब्ज डॉलर्स इतके होते. जुलै 2023 च्या आकडेवारीनुसार, फ्लीपकार्टमध्ये अमेरिकेची वॉलमार्ट कंपनीचा 80 टक्के हिस्सा आहे. त्यानंतर डिसेंबर 2023 मध्ये फ्लीपकार्टने आपल्या व्यवसाय विस्तारासाठी 1 अब्ज डॉलर्स (सुमारे 8300 कोटी रुपये) उभा करण्याचा निर्णय घेतला. यापैकी वॉलमार्टने 600 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 5 हजार कोटी रुपये) ची गुंतवणूक केली. आता वॉलमार्टसोबतच गुगल या आंतरराष्ट्रीय कंपनीनेदेखील हिस्सा खरेदी केला.
जानेवारी ते एप्रिलदरम्यान रिझर्व्ह बँकेकडून आंतरराष्ट्रीय बाजारात जोरदार सोने खरेदी. या चार महिन्यांत रिझर्व्ह बँकेने तब्बल 24 टन सोन्याचे साठे खरेदी केले. 26 एप्रिल 2024 च्या आकडेवारीनुसार, रिझर्व्ह बँकेकडे सध्या तब्बल 827.69 टन सोन्याचा साठा आहे. देशाचे चलन स्थिर ठेवणे आणि भू-राजकीय तणाव तसेच मंदीच्या काळाशी सामना करण्यासाठी सोन्याचे साठे देशाजवळ असणे महत्त्वाचे मानले जाते. याच दरम्यान चीनसारख्या विकसनशील अर्थव्यवस्थांनीदेखील सोने खरेदीवर भर दिला. 1991 च्या मंदीच्यावेळी असलेला सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची नामुश्की ओढावलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेने केवळ 3 दशकांत जगातील सर्वाधिक सोन्याचा साठा असलेल्या 10 देशांमध्ये स्थान मिळवले.
मार्च 2024 मध्ये संपलेल्या तिमाहीत पेटीएम कंपनीचा तोटा मागील वर्षाच्या तुलनेत तिप्पट झाला. पेटीएमची मूळ कंपनी ‘वन 97’ला एकाच तिमाहीत तब्बल 550 कोटींचा तोटा झाला. मागील वर्षी याच तिमाहीत हा तोटा 168 कोटी होता. कंपनीचा महसूलदेखील 3 टक्के घटून 2267 कोटी झाला. 31 जानेवारी रोजी रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट बँकेवर बंधने आणण्याची घोषणा केली. याचा फटका कंपनीला बसला. लवकरच कर्मचारी कपात होण्याचा संकेतदेखील कंपनीतर्फे मिळत असल्याचे सांगितले जाते.
आदित्य बिर्ला समूची महत्त्वाची कंपनी ‘ग्रासीम’चा मागील आर्थिक वर्षाचा शेवटच्या तिमाहीचा नफा केवळ 1 कोटीने वधारून 1370 कोटींवर कायम राहिला. कंपनीचा महसूल मात्र 12.7 टक्के वधारून 33462 कोटींवरून 37727 कोटी झाला.
सरकारी पोलाद उत्पादक कंपनी ‘सेल’ (स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया)चा मार्च 2024 तिमाहीचा निव्वळ नफा 2 टक्के घटून 1126 कोटींवर आला. कंपनीचा महसूलदेखील 29130 कोटींवरून 27958 कोटींवर खाली आला. महसूल घटल्याने तसेच पोलाद उत्पादनासाठी लागणार्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने कंपनीचा निव्वळ नफा घटल्याचे विश्लेषकांचे मत.
युरोपमधील ‘जॅग्वार अँड लँडरेव्हर’ कंपनी जी भारतीय टाटा मोटर्सची उपकंपनी आहे. भारतात रेंजरोव्हर गाड्यांचे उत्पादन करणार. ऑगस्टपासून पुण्यात उत्पादन सुरू झाल्यावर गाड्यांच्या किमती सुमारे 18 ते 20 टक्क्यांनी म्हणजेच सुमारे 54 लाखांनी कमी होतील. सध्या रेंजरेव्हर केवळ युनायटेड किंग्डममध्ये उत्पादित केल्या जातात; परंतु टाटा मोटर्सनी मेक इन इंडिया धोरण अवलंबल्याने त्यांचे उत्पादन पुणेस्थित टाटा मोटर्सच्या प्रकल्पात केले जाणार. मागील आर्थिक वर्षात जॅग्वार लँड रेव्हरची भारतातील विक्री 81 टक्के वधारून 4436 गाड्यांपर्यंत पोहोचली. 15 वर्षांपूर्वी रतन टाटांनी जॅग्वार लँड रोव्हर टाटा मोटर्सच्या आधिपत्त्याखाली आणण्याचा निर्णय घेतला आणि युरोपमधील या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या अधिग्रहणानंतर टाटा मोटर्सचा जागतिक स्तरावरील वाहन उत्पादक कंपनी म्हणून ठसा उमटला.
17 मे रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची विदेश चलन गंगाजळी 4.5 अब्ज डॉलर्सनी वधारून पुन्हा विक्रमी पातळीवर म्हणजेच 648.7 अब्ज डॉलर्सवर पोहोचली. मागील सलग तीन सप्ताहात गंगाजळीने वाढ दर्शवली आहे.
प्रीतम मांडके (मांडके फिनकॉर्प)
हेही वाचा :
कोण आहेत दुसरे सर्वाधिक पगार घेणारे CEO निकेश अरोरा?
करबचतीसाठी गुंतवणूक करताय! ‘या’ गोष्टी कटाक्षाने टाळा
पॅनकार्ड निष्क्रिय झाल्यास रिटर्न कसे भरावे?