pune porsche accident : अनिश-अश्विनीच्या न्यायासाठी आंदोलन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पोर्शे कार अपघातात जीव गमावलेल्या अश्विनी कोष्टा आणि अनिश अवधिया यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी रविवारी (दि.26) पुणे महानगर पालिकेसमोर आंदोलन करण्यात आले. या वेळी अनेक पुणेकरांनी यात सहभाग घेतला होता. समाजसेवक दुष्यंत दुबे यांच्या नेतृत्वाखाली शिवाजीनगर येथील महापालिका भवनाच्या गेटजवळ एकत्र येऊन पुणेकरांनी रविवारी आंदोलन केले. या वेळी अश्विनी …

pune porsche accident : अनिश-अश्विनीच्या न्यायासाठी आंदोलन

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : पोर्शे कार अपघातात जीव गमावलेल्या अश्विनी कोष्टा आणि अनिश अवधिया यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी रविवारी (दि.26) पुणे महानगर पालिकेसमोर आंदोलन करण्यात आले. या वेळी अनेक पुणेकरांनी यात सहभाग घेतला होता. समाजसेवक दुष्यंत दुबे यांच्या नेतृत्वाखाली शिवाजीनगर येथील महापालिका भवनाच्या गेटजवळ एकत्र येऊन पुणेकरांनी रविवारी आंदोलन केले.

या वेळी अश्विनी आणि अनिश यांना पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. उपस्थितांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या समर्थनार्थ पत्रे लिहिली आणि अपराध्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. पुढील आठवड्यात आंदोलनकर्ते अनिश आणि अश्विनी यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देणार असल्याचे सांगण्यात आले.

महापालिका गेटसमोर केली निदर्शने
पुष्पांजली अर्पण करून वाहिली श्रद्धांजली
आंदोलनकर्ते देणार उपमुख्यमंत्र्यांना निवेदन
कुटुंबीयांच्या समर्थनार्थ उपस्थितांनी लिहिली पत्रे

हेही वाचा

पर्यटक उन्हात; प्रशासन कोमात! शनिवारवाडा प्रवेशद्वारावर तिकीटासाठी दमछाक
चंद्रपूर : ताडोबात वाघिणीच्या भ्रमणमार्गात अडथळा; १० जिप्सी महिनाभरासाठी निलंबित
एआय रोबोटिक सर्जरीमुळे शक्य होणार मेंदूचे प्रत्यारोपण!