जामीन मुदत वाढीसाठी केजरीवालांची सर्वोच्च न्यायालयात धाव

पुढारी ऑनलाईन डेस्क: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या अंतरिम जामिनाला ७ दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली आहे. या मागणी संदर्भातील याचिका केजरीवालांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. आरोग्याच्या काही तपासण्या करण्यासाठी केजरीवलांनी (Arvind Kejriwal) जामीन वाढवून मागितल्याचे ‘इंडिया टुडे’ ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी न्यायालयाने त्यांचा अंतरिम जामीन अर्ज मंजूर …

जामीन मुदत वाढीसाठी केजरीवालांची सर्वोच्च न्यायालयात धाव

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या अंतरिम जामिनाला ७ दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली आहे. या मागणी संदर्भातील याचिका केजरीवालांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. आरोग्याच्या काही तपासण्या करण्यासाठी केजरीवलांनी (Arvind Kejriwal) जामीन वाढवून मागितल्याचे ‘इंडिया टुडे’ ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी न्यायालयाने त्यांचा अंतरिम जामीन अर्ज मंजूर केल्यानंतर १० मे रोजी त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. केजरीवाल यांचा अंतरिम जामीन संपुष्टात येण्याच्या एका दिवसानंतर म्हणजे २ जून रोजी तुरुंग प्रशासनासमोर हजर रहावे लागणार आहे. परंतु केजरीवाल यांना पीईटी-सीटी स्कॅन आणि इतर वैद्यकीय चाचण्या कराव्या लागणार आहेत. यासाठी त्यांनी (Arvind Kejriwal) तपासण्यांसाठी ७ दिवस मागितले आहेत, अशी माहिती आप आदमी पार्टीने दिली असल्याचेही वृत्तात म्हटले आहे.
दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी 21 मार्च, २०२४ रोजी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आम आदमी पार्टीचे सुप्रिमो आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना तिहार तुरुंगात ठेवण्यात आले होते. दरम्यान त्यांना लोकसभा निवडणूकांसाठी 10 मे रोजी त्यांची अंतरिम जामीन मंजूर (Arvind Kejriwal) करण्यात आला होता. यानंतर त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली.
हेही वाचा:

Arvind Kejriwal : पंतप्रधान मोदींना आम आदमी पक्ष संपवायचा आहे : अरविंद केजरीवाल
Arvind Kejriwal: देशभरात 200 युनिट मोफत वीज : केजरीवालांनी जाहीर केल्‍या १० गॅरंटी
Arvind Kejriwal | मोठी बातमी : अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा! १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर

Go to Source