Pune : दौंडच्या तिसर्‍या कुरकुंभ मोरीचे काम झालेय निकृष्ट

दौंड : पुढारी वृत्तसेवा : पुणे- सोलापूर रेल्वे मार्गावरील दौंड शहरातील तिसर्‍या कुरकुंभ मोरीचे काम अतिशय निकृष्ट झाले आहे. मोरी ठीकठिकाणी गळत आहे. मोरीत गटाराचे पाणी येत आहे. रेल्वे अधिकारी याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. ठेकेदाराला पोसण्याचे काम हे अधिकारी करत आहेत. रेल्वे प्रशासनाने संबंधित ठेकेदाराकडून हे काम योग्य पद्धतीने अजून करून घ्यावे, नाहीतर रेल्वे … The post Pune : दौंडच्या तिसर्‍या कुरकुंभ मोरीचे काम झालेय निकृष्ट appeared first on पुढारी.
#image_title

Pune : दौंडच्या तिसर्‍या कुरकुंभ मोरीचे काम झालेय निकृष्ट

दौंड : पुढारी वृत्तसेवा : पुणे- सोलापूर रेल्वे मार्गावरील दौंड शहरातील तिसर्‍या कुरकुंभ मोरीचे काम अतिशय निकृष्ट झाले आहे. मोरी ठीकठिकाणी गळत आहे. मोरीत गटाराचे पाणी येत आहे. रेल्वे अधिकारी याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. ठेकेदाराला पोसण्याचे काम हे अधिकारी करत आहेत. रेल्वे प्रशासनाने संबंधित ठेकेदाराकडून हे काम योग्य पद्धतीने अजून करून घ्यावे, नाहीतर रेल्वे अधिकारी व ठेकेदारावर कामात निष्काळजीपणा केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. या कामाला सुरुवातीपासूनच अनेक मोठे अडथळे आले, हे काम रेल्वे प्रशासनाने त्यांच्या मनमानी, हुकूमशाही पद्धतीने केले.
रडतखडत ही कुरकुंभ मोरी मार्च 2023 मध्ये अर्धवट अवस्थेत रेल्वे प्रशासनाने नागरिकांच्या रेट्यामुळे सुरू केली, परंतु त्यानंतर राहिलेले काम त्यांनी पूर्ण केले नाही. मोरीतून वाहणारे गटाराचे पाणी पूर्णपणे थांबवणे गरजेचे होते, परंतु आजपर्यंत रेल्वे प्रशासनाकडून व संबंधित ठेकेदाराकडून हे काम पूर्ण झालेले नाही. आजदेखील नागरिकांना दररोज सकाळी तिसर्‍या नव्या कुरकुंभ मोरीमधून गटारीच्या पाण्यातूनच ये- जा करावी लागते. कर रूपाने गोळा केलेला पैसा शासनाने यांना निधी म्हणून दिला परंतु रेल्वे अधिकारी व ठेकेदाराने हा त्यांच्या मनमानी पद्धतीने कारभार करून उडवला आहे.
या कुरकुंभ मोरीचे श्रेय सत्ताधारी व विरोधकांनी आपापल्या परीने घेतले. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी मात्र या कुरकुंभ मोरीचा आम्हीच पाठपुरावा करून काम पूर्ण करून घेतले असे फलक त्या वेळेस लावले, परंतु आता तिसर्‍या कुरकुंभ मोरीची परिस्थितीसुद्धा जुन्या कुरकुंभ मोरीप्रमाणे झाल्याने तोंडे गप्प करून बसले आहेत.
श्रेय घेणारे राजकीय नेते गप्प
या कुरकुंभ मोरीचे श्रेय घेणारे राजकीय नेते मात्र आता गप्प का बसले आहेत हेच समजेना, का त्यांनाही ठेकेदाराने मॅनेज केले अशी शंका लोक विचारू लागले आहेत. या नेत्यांनी मोहात न पडता याबाबत आवाज उठवावा व नागरिकांची गटाराच्या घाण पाण्यातून सुटका करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. येणार्‍या काळात निवडणुका आहेत, जर नव्या तिसर्‍या कुरकुंभ मोरीचे काम जर नीट करून घेतले नाही तर याची किंमत श्रेय लाटणार्‍या राजकीय पक्षांना नक्कीच मोजावी लागेल, यात मात्र शंका नाही.
हेही वाचा :

दूध पावडर तयार करण्यावर निर्णयच नाही ; दूध उत्पादक शेतकरी अडचणीत
Pune : अवकाळीने 11 हजार हेक्टरवरील पिके बाधित

The post Pune : दौंडच्या तिसर्‍या कुरकुंभ मोरीचे काम झालेय निकृष्ट appeared first on पुढारी.

दौंड : पुढारी वृत्तसेवा : पुणे- सोलापूर रेल्वे मार्गावरील दौंड शहरातील तिसर्‍या कुरकुंभ मोरीचे काम अतिशय निकृष्ट झाले आहे. मोरी ठीकठिकाणी गळत आहे. मोरीत गटाराचे पाणी येत आहे. रेल्वे अधिकारी याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. ठेकेदाराला पोसण्याचे काम हे अधिकारी करत आहेत. रेल्वे प्रशासनाने संबंधित ठेकेदाराकडून हे काम योग्य पद्धतीने अजून करून घ्यावे, नाहीतर रेल्वे …

The post Pune : दौंडच्या तिसर्‍या कुरकुंभ मोरीचे काम झालेय निकृष्ट appeared first on पुढारी.

Go to Source