हिंगोलीचे माजी आमदार दगडू गलांडे यांचे निधन

हिंगोलीचे माजी आमदार दगडू गलांडे यांचे निधन

हिंगोली; Bharat Live News Media वृत्तसेवा : हिंगोलीचे माजी आमदार दगडू गलांडे यांचे रविवारी (दि.२७) सायंकाळी सातच्या सुमारास वृद्धापकाळाने  निधन झाले. ते ९१ वर्षाचे होते. साधी राहणी आणि  मनमिळावू स्वभावाचे व्यक्तीमत्त्व, अशी त्यांची जनमाणसात प्रतिमा होती.
गलांडे यांच्यावर बाभुळगाव येथे सोमवारी (दि.२७) सकाळी दहा वाजता त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या मागे दोन मुले, सहा मुली, नातवंंडे, पतवंडे असा परिवार आहे. गांधीवादी विचारसरणीचे गलांडे हे भारतीय जनता पक्षाच्या काळात १९७८ साली विधानसभेवर निवडून गेले होते. आणीबाणी विरोधी आंदोलनात ते सक्रिय होते. संत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या विचारसरणीचा त्यांच्यावर प्रभाव होता. गेल्या काही वर्षापासून ते वृद्धापकाळामुळे राजकारणापासून दूर होते.
हेही वाचा :

उत्तर भारतासह मध्य महाराष्ट्राला ३० मेपर्यंत उष्णतेचा रेड अलर्ट
कोल्हापूर : राजापूर बंधारा ऐन उन्हाळ्यात ओव्हरफ्लो; 450 क्युसेक्सने विसर्ग सुरु
रत्नागिरी: कोकणातील जलपर्यटन ३१ ऑगस्टपर्यंत बंद राहणार