Pune : सोमेश्वर कारखान्याची पहिली उचल 3 हजार

सोमेश्वरनगर : पुढारी वृत्तसेवा : सोमेश्वर साखर कारखान्याने चालू हंगामाची पहिली उचल प्रतिटन 3 हजार रुपये इतकी द्यावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. त्यावर संचालक मंडळाच्या बैठकीत अधिकृतपणे शिक्कामोर्तब केले जाणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. कोर्‍हाळे बुद्रुक (ता. बारामती) येथे भगत कुटुंबाच्या श्रीराम समूह शेतीस पवार यांनी भेट … The post Pune : सोमेश्वर कारखान्याची पहिली उचल 3 हजार appeared first on पुढारी.
#image_title

Pune : सोमेश्वर कारखान्याची पहिली उचल 3 हजार

सोमेश्वरनगर : पुढारी वृत्तसेवा : सोमेश्वर साखर कारखान्याने चालू हंगामाची पहिली उचल प्रतिटन 3 हजार रुपये इतकी द्यावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. त्यावर संचालक मंडळाच्या बैठकीत अधिकृतपणे शिक्कामोर्तब केले जाणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. कोर्‍हाळे बुद्रुक (ता. बारामती) येथे भगत कुटुंबाच्या श्रीराम समूह शेतीस पवार यांनी भेट दिली आणि शेतकर्‍यांच्या बांधावर संचालक मंडळाशी चर्चा करून 3 हजार रुपये पहिली उचल देण्याच्या सूचना केल्या. सध्याच्या सूत्रानुसार 10.25 टक्के साखर उतार्‍यावर आधारित 3 हजार 150 रुपये प्रतिटन एफआरपी येते. त्यातून मागील दोन आर्थिक वर्षांचा सरासरी ऊस तोडणी खर्च 692 रुपये प्रतिटन वजा जाता देय एफआरपी 2 हजार 458 रुपये प्रतिटन येते. तर, एकरकमी एफआरपी सूत्रानुसार सुमारे 2 हजार 958 रुपये येते. मात्र, सोमेश्वर कारखाना छत्रपती कारखान्याशी बरोबरी करत जिल्ह्यात सर्वाधिक 3 हजार रुपये उचल देणार आहे. याबाबत लवकरच संचालक मंडळाच्या मासिक सभेत चर्चा करून यावर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.
हेही वाचा :

इथे पाच मिनिटांच्या अंतरासाठी लागतो तब्बल एक तास! नागरिकांचा संताप
Nilesh Rane : निलेश राणे लोकसभा निवडणूक लढवणार का? पोस्ट चर्चेत

The post Pune : सोमेश्वर कारखान्याची पहिली उचल 3 हजार appeared first on पुढारी.

सोमेश्वरनगर : पुढारी वृत्तसेवा : सोमेश्वर साखर कारखान्याने चालू हंगामाची पहिली उचल प्रतिटन 3 हजार रुपये इतकी द्यावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. त्यावर संचालक मंडळाच्या बैठकीत अधिकृतपणे शिक्कामोर्तब केले जाणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. कोर्‍हाळे बुद्रुक (ता. बारामती) येथे भगत कुटुंबाच्या श्रीराम समूह शेतीस पवार यांनी भेट …

The post Pune : सोमेश्वर कारखान्याची पहिली उचल 3 हजार appeared first on पुढारी.

Go to Source