जेसन होल्डरची माघार; वेस्ट इंडिजच्या वर्ल्डकप संघात बदल

त्रिनिदाद; वृत्तसंस्था : क्रिकेट वेस्ट इंडिजने आगामी टी-20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी संघात बदल केला. अनुभवी गोलंदाज जेसन होल्डर याने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे आणि त्याच्या जागी डावखुरा वेगवान गोलंदाज ओबेड मॅककॉय याला संघात स्थान देण्यात आले आहे. होल्डरची अनुपस्थिती लक्षणीय असताना, मॅककॉयच्या समावेशासह संघ मजबूत राहील, अशी क्रिकेट वेस्ट इंडिजला खात्री आहे. काऊंटी चॅम्पियनशिप 2024 …

जेसन होल्डरची माघार; वेस्ट इंडिजच्या वर्ल्डकप संघात बदल

त्रिनिदाद; वृत्तसंस्था : क्रिकेट वेस्ट इंडिजने आगामी टी-20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी संघात बदल केला. अनुभवी गोलंदाज जेसन होल्डर याने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे आणि त्याच्या जागी डावखुरा वेगवान गोलंदाज ओबेड मॅककॉय याला संघात स्थान देण्यात आले आहे. होल्डरची अनुपस्थिती लक्षणीय असताना, मॅककॉयच्या समावेशासह संघ मजबूत राहील, अशी क्रिकेट वेस्ट इंडिजला खात्री आहे. काऊंटी चॅम्पियनशिप 2024 दरम्यान होल्डरला दुखापत झाली होती.
क्रिकेट वेस्ट इंडिजचे निवड समिती प्रमुख डॉ. डेस्मंड हेन्स यांनी सांगितले की, जेसन आमच्या सेटअपमधील एक अनुभवी खेळाडू आहे. त्याची अनुपस्थिती निःसंशयपणे मैदानावर जाणवेल. आम्ही लवकरच आमच्यासोबत पूर्णपणे तंदुरुस्त जेसनची अपेक्षा करतो. जेसनच्या क्षमतेचा खेळाडू गमावणे दुर्दैवी असले तरी, आम्हाला मॅककॉयच्या क्षमतेवर विश्वास आहे. ओबेडने त्याच्या कामगिरीमध्ये उल्लेखनीय कौशल्य आहे आणि या संधीमुळे त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिभा आणखी दाखवण्याची संधी मिळेल.
वेस्ट इंडिजचा अपडेट संघ : रोव्हमन पॉवेल (कर्णधार), अल्झारी जोसेफ (उपकर्णधार), जॉन्सन कार्लेस, रोस्टन चेस, शिमरोन हेटमायर, शे होप, अकिल होसैन, शामर जोसेफ, ब्रेंडन किंग, ओबेड मॅककॉय, गुदाकेश मोती, निकोलस पूरन, आंद्रे रसेल, शेर्फाने रुथरफोर्ड, रोमारिओ शेफर्ड; राखीव- कायले मेयर्स, मॅथ्यू फोर्ड, फॅबिएन अ‍ॅलेन, हेडन वॉल्श, आंद्रे फ्लेचर.