तुला पळवून नेईन ! पतीसमोरच विवाहितेला धमकी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ‘माझ्याशी लग्न कर, नाही तर तुझ्या पतीला मारून टाकेन,’ अशी धमकी पतीसमोर देणार्‍या एकावर खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जावेद इराणी (24, पाटील इस्टेट, शिवाजीनगर) असे त्याचे नाव आहे. याबाबत 26 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. 2022 ते 27 नोव्हेंबरदरम्यान हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी … The post तुला पळवून नेईन ! पतीसमोरच विवाहितेला धमकी appeared first on पुढारी.
#image_title

तुला पळवून नेईन ! पतीसमोरच विवाहितेला धमकी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ‘माझ्याशी लग्न कर, नाही तर तुझ्या पतीला मारून टाकेन,’ अशी धमकी पतीसमोर देणार्‍या एकावर खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जावेद इराणी (24, पाटील इस्टेट, शिवाजीनगर) असे त्याचे नाव आहे. याबाबत 26 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. 2022 ते 27 नोव्हेंबरदरम्यान हा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी ओळखीचे असून, आरोपी जावेदला फिर्यादीचे लग्न झालेले असल्याचे माहीत होते. तरीदेखील आरोपी एक वर्षापासून पीडितेचा पाठलाग करीत होता. तिला वेळोवेळी रस्त्यात गाठून ‘मला तुझ्याशी लग्न करायचे आहे,’ असे म्हणत होता. एके दिवशी त्याने तिला रस्त्यात गाठून तिचा हात पकडत तिचा विनयभंग केला. याच कारणास्तव तिने त्याला चापट मारली असता आरोपीने ‘लग्न कर; अन्यथा तुझ्या पती व कुटुंबाला मारून टाकीन व तुला पळवून नेऊन तुझ्याशी लग्न करेन,’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
हेही वाचा
जळगाव जिल्ह्यात दोन लाख ५० हजार रुपयांच्या चोऱ्या
Pune : अवकाळीने 11 हजार हेक्टरवरील पिके बाधित
Sam Bahadur चित्रपटातील युद्ध प्रसंगासाठी रणगाडे, क्षेपणास्त्र डागणाऱ्या वाहनांचा समावेश
The post तुला पळवून नेईन ! पतीसमोरच विवाहितेला धमकी appeared first on पुढारी.

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ‘माझ्याशी लग्न कर, नाही तर तुझ्या पतीला मारून टाकेन,’ अशी धमकी पतीसमोर देणार्‍या एकावर खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जावेद इराणी (24, पाटील इस्टेट, शिवाजीनगर) असे त्याचे नाव आहे. याबाबत 26 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. 2022 ते 27 नोव्हेंबरदरम्यान हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी …

The post तुला पळवून नेईन ! पतीसमोरच विवाहितेला धमकी appeared first on पुढारी.

Go to Source