‘माझा बाप बिल्डर असता तर..!’ युवक  काँग्रेसकडून निबंध स्पर्धा

पुणे : पुढारी वृत्तसेवा,  कल्याणीनगर येथील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसच्या वतीने उपरोधिकपणे एका अनोख्या निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी ‘माझा बाप बिल्डर असता तर…’ यासह विविध विषय देण्यात येणार असून, या स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते होणार आहे. (Pune porsche accident) युवक काँग्रेसकडून आज अनोखी निबंध स्पर्धा …
‘माझा बाप बिल्डर असता तर..!’ युवक  काँग्रेसकडून निबंध स्पर्धा

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा,  कल्याणीनगर येथील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसच्या वतीने उपरोधिकपणे एका अनोख्या निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी ‘माझा बाप बिल्डर असता तर…’ यासह विविध विषय देण्यात येणार असून, या स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते होणार आहे. (Pune porsche accident)
युवक काँग्रेसकडून आज अनोखी निबंध स्पर्धा
या स्पर्धेसाठी ‘माझा बाप बिल्डर असता तर…’, माझी आवडती कार (पोर्शे, फरारी, मर्सिडिज), दारूचे दुष्परिणाम, मी खरंच पोलिस अधिकारी झालो तर…, अश्विनी आणि अनिशचे मारेकरी कोण? असे विषय स्पर्धकांना देण्यात येणार आहेत. स्पर्धेची वयोमर्यादा १७ वर्षे ते ५८ वर्षे आहे. ही स्पर्धा अपघात झालेल्या कल्याणीनगर येथील बॉलर पबसमोर रविवारी सकाळी ९ ते दुपारी १२ या दरम्यान घेतली जाणार आहे. Pune porsche accident

व्यवस्थेची चिड येत असेल तर घरी बसून संताप करण्यापेक्षा लोकशाही मार्गाने आपला विरोध नोंदवा..
जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा.#justicefor_anishashvini #puneaccident #dhangekar_pattern pic.twitter.com/YVFdkJceHL
— Ravindra Dhangekar Official (@DhangekarINC) May 25, 2024

हेही वाचा 

Pune porsche accident : पोर्शे अपघात प्रकरण; संशयीत आरोपीच्या आजोबाला अटक 
Pune Porsche Car Accident | ‘ही हत्या आहे, अपघात नाही’, पुणे अपघातातील मृत अभियंत्याच्या कुटुबियांची तीव्र प्रतिक्रिया
pune porsche accident : ’तू बस बाजूला अन् मुलाला गाडी चालवायला दे’
Pune Porsche Car Accident | आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे; अमृता फडणवीसांची पोस्ट चर्चेत