घरी सुरू होती लग्नाची तयारी; यापूर्वीच मोठ्या भावाने उचललं टोकाचं पाऊल

तळेगाव ढमढेरे : पुढारी वृत्तसेवा :  जातेगाव बुद्रुक येथील एका युवकाने लहान भावाच्या लग्नाच्या दोन दिवस आधी सोमवारी (दि. 27) गळफास घेऊन आत्महत्या केली. गणेश भाऊसाहेब वर्पे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथील रामदास वर्पे या युवकाचे बुधवारी (दि. 29) लग्न असल्याने त्याचा मोठा भाऊ गणेश वर्पे याने कंपनीतून सुटी … The post घरी सुरू होती लग्नाची तयारी; यापूर्वीच मोठ्या भावाने उचललं टोकाचं पाऊल appeared first on पुढारी.
#image_title

घरी सुरू होती लग्नाची तयारी; यापूर्वीच मोठ्या भावाने उचललं टोकाचं पाऊल

तळेगाव ढमढेरे : पुढारी वृत्तसेवा :  जातेगाव बुद्रुक येथील एका युवकाने लहान भावाच्या लग्नाच्या दोन दिवस आधी सोमवारी
(दि. 27) गळफास घेऊन आत्महत्या केली. गणेश भाऊसाहेब वर्पे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथील रामदास वर्पे या युवकाचे बुधवारी (दि. 29) लग्न असल्याने त्याचा मोठा भाऊ गणेश वर्पे याने कंपनीतून सुटी घेतली होती. सोमवारी (दि. 27) लग्नाच्या दंडवताचा कार्यक्रम असल्याने सर्व जण शेतातील देवाचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. त्याचवेळी त्यांना शेतातील खोलीमध्ये गणेश भाऊसाहेब वर्पे (वय 36, रा. जातेगाव बुद्रुक, ता. शिरूर) याने गळफास घेतल्याचे दिसून आले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस हवालदार गणेश करपे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. गणेशच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. दरम्यान मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शिक्रापूर पोलिस ठाण्यात याबाबत रामदास भाऊसाहेब वर्पे (वय 32, रा.जातेगाव बुद्रुक, ता. शिरूर) यांनी खबर दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक वैभव पवार हे या घटनेचा तपास करीत आहेत.
The post घरी सुरू होती लग्नाची तयारी; यापूर्वीच मोठ्या भावाने उचललं टोकाचं पाऊल appeared first on पुढारी.

तळेगाव ढमढेरे : पुढारी वृत्तसेवा :  जातेगाव बुद्रुक येथील एका युवकाने लहान भावाच्या लग्नाच्या दोन दिवस आधी सोमवारी (दि. 27) गळफास घेऊन आत्महत्या केली. गणेश भाऊसाहेब वर्पे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथील रामदास वर्पे या युवकाचे बुधवारी (दि. 29) लग्न असल्याने त्याचा मोठा भाऊ गणेश वर्पे याने कंपनीतून सुटी …

The post घरी सुरू होती लग्नाची तयारी; यापूर्वीच मोठ्या भावाने उचललं टोकाचं पाऊल appeared first on पुढारी.

Go to Source