इथे पाच मिनिटांच्या अंतरासाठी लागतो तब्बल एक तास

धनकवडी : पुढारी वृत्तसेवा : दत्तनगर चौक, त्रिमूर्ती चौक, चंद्रभागानगर चौक, कात्रज डेअरी चौक, भारतीय विद्यापीठामागील गेट आणि कश्मीर मैत्री चौकांतील रस्त्यांवर मंगळवारी रात्री दोन तास मोठी वाहतूक कोंडी झाली. यामुळे कात्रज व धनकवडी परिसरातील वाहनचालक व नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. या भागातील रस्त्यांवर सायंकाळी सातपासून ते रात्री नऊपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्याचे चित्र … The post इथे पाच मिनिटांच्या अंतरासाठी लागतो तब्बल एक तास appeared first on पुढारी.
#image_title

इथे पाच मिनिटांच्या अंतरासाठी लागतो तब्बल एक तास

धनकवडी : पुढारी वृत्तसेवा : दत्तनगर चौक, त्रिमूर्ती चौक, चंद्रभागानगर चौक, कात्रज डेअरी चौक, भारतीय विद्यापीठामागील गेट आणि कश्मीर मैत्री चौकांतील रस्त्यांवर मंगळवारी रात्री दोन तास मोठी वाहतूक कोंडी झाली. यामुळे कात्रज व धनकवडी परिसरातील वाहनचालक व नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. या भागातील रस्त्यांवर सायंकाळी सातपासून ते रात्री नऊपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले.
या वेळी वाहनाचालकांना पाच ते सात मिनिटांच्या अंतरासाठी सुमारे तासभराचा कालावधी लागला. वाहतुकीच्या अडथळ्याची शर्यत करीत नागरिकांना घरी पोहचावे लागले. परिसरातील सातत्याने होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शाळकरी विद्यार्थी आणि नोकरदारांना दररोजच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्रिमूर्ती चौक ते राजमाता भुयारी मार्ग हा रस्ता मुळातच अरुंद असून, दोन्ही बाजूला वाहने अनधिकृतपणे पार्किंग केली जातात. यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. परिसरातील अनेक इमारतींसमोर पार्किंगची सोय नसल्याने वाहतुकीस अडथळा होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
हेही वाचा
Pune : अवकाळीने 11 हजार हेक्टरवरील पिके बाधित
Pune News : चाकणच्या हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करा : अजित पवार
कौन बनेगा करोडपती -15 : हरियाणाच्या मयंक ठरला 1 कोटीचा विजेता
The post इथे पाच मिनिटांच्या अंतरासाठी लागतो तब्बल एक तास appeared first on पुढारी.

धनकवडी : पुढारी वृत्तसेवा : दत्तनगर चौक, त्रिमूर्ती चौक, चंद्रभागानगर चौक, कात्रज डेअरी चौक, भारतीय विद्यापीठामागील गेट आणि कश्मीर मैत्री चौकांतील रस्त्यांवर मंगळवारी रात्री दोन तास मोठी वाहतूक कोंडी झाली. यामुळे कात्रज व धनकवडी परिसरातील वाहनचालक व नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. या भागातील रस्त्यांवर सायंकाळी सातपासून ते रात्री नऊपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्याचे चित्र …

The post इथे पाच मिनिटांच्या अंतरासाठी लागतो तब्बल एक तास appeared first on पुढारी.

Go to Source