छत्तीसगडमध्ये काँग्रेस-भाजप काट्याची लढत

छत्तीसगडमध्ये काँग्रेस-भाजप काट्याची लढत

– स्मिता शर्मा

जांजगीर-चम्पामध्ये यावेळीही चुरस जांजगीर-चम्पा मतदारसंघात गतवेळी मोठी चुरस झाली होती आणि भाजपचे उमेदवार नारायण चंदेल यांनी काँग्रेसच्या मोतीलाल देवांगण यांच्यावर विजय मिळवला होता. त्यावेळी चंदेल यांना 54 हजार मते मिळाली होती, तर देवांगण यांना 50 हजारच्या आसपास मते मिळाली होती. यावेळी काँग्रेसने उमेदवार बदलला आहे. पक्षाने व्यास कश्यप यांना मैदानात उतरविले असून, भाजपकडून गतवेळचे विजेते चंदेल हेच मैदानात आहेत. दुसर्‍या टप्प्यातील ज्या प्रमुख लढती आहेत, त्यात जांजगीर – चम्पा मतदारसंघाचा समावेश असल्याने येथील निवडणुकीकडे सर्वांची नजर लागली आहे. (Chhattisgarh Assembly Election 2023)
सीतापूरमध्ये भाजपचा संघर्ष…
उत्तर छत्तीसगडमधील सीतापूर मतदारसंघात भाजपला दीर्घ काळापासून विजय मिळवता आलेला नाही. उरांव समाजाची मोठी लोकसंख्या असलेल्या सीतापूरमध्ये काँग्रेसचा दबदबा आहे. दोनवेळा अपक्षांनी याठिकाणी बाजी मारली होती, मात्र भाजपला अजूनही बस्तान बसवता आलेले नाही. गतवेळच्या निवडणुकीत काँग्रेसच्या अमरजीत भगत यांनी भाजपच्या गोपाल राम यांनाा पराभूत केले होते. सलग चारवेळा सीतापूर मध्ये विजय मिळवलेले भगत पाचव्यांदा निवडणुकीचे मैदान मारण्यासाठी सज्ज झाले आहेत.
मनेंद्रगडला काँग्रेसने लावली ताकद
कोरिया जिल्ह्यातील मनेंद्रगड विधानसभा मतदारसंघात गतवेळी काँग्रेसच्या डॉ. विनय जायस्वाल यांनी विजय मिळवला होता. तर तत्पूर्वी 2013 च्या निवडणुकीत भाजपचे श्यामबिहारी जायस्वाल विजयी ठरले होते. गत निवडणुकीत 73 टक्के मतदान झाले होते. डॉ. विनय जायस्वाल यांनी त्यावेळी श्याम जायस्वाल यांचा चार हजारपेक्षा जास्त मतांनी पराभव केला होता. गतवेळप्रमाणे याही वेळी हा मतदारसंघ काबीज करण्यासाठी काँग्रेसने सगळी ताकद लावल्याचे दिसत आहे.
कोरबा : चारही ठिकाणी टक्कर
कोरबा जिल्ह्यातील चारही मतदारसंघात यावेळी ‘काँटे की टक्कर’ पहावयास मिळत आहे. रामपूर मतदारसंघाचा विचार केला तर कमी मतदानाचा भाजपला लाभ होत असल्याचे दिसून येते. 2013 मध्ये याठिकाणी विक्रमी 84 टक्के मतदान झाले होते आणि काँग्रेसला विजय मिळाला होता. 2018 मध्ये मतदानाची टक्केवारी कमी झाली आणि भाजपने विजय प्राप्त केला. कोरबा आणि रामपूरसह पाली-तानाखार तसेच कटघोरा मतदारसंघातील लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बिलासपूर : काँग्रेसमध्ये बंडखोरी
बिलासपूर मतदारसंघात तिकीट न मिळाल्यामुळे काँग्रेसचे नेते पिनाल उपवेजा यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे अर्थातच भाजपचे उमेदवार अमर अगरवाल यांची बाजू भक्कम झाली आहे. या मतदारसंघात गतवेळी काँग्रेसच्या शैलेश पांडे यांनी विजय मिळवला होता; तर तत्पूर्वी 2013 च्या निवडणुकीत अमर अगरवाल हे विजयी झाले होते. भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी सिनेस्टार रवी किशन यांच्यासह अन्य स्टार प्रचारक मैदानात उतरले आहेत. त्याचा कितपत फायदा भाजपला होणार, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. (Chhattisgarh Assembly Election 2023)
रायगडमधील लढतीकडे लक्ष
राज्यातील महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून रायगड मतदारसंघाकडे पाहिले जाते. गतवेळी येथे काँग्रेसच्या प्रकाश नायक यांनी विजय मिळवला होता. भाजपच्या रोशन लाल यांचा त्यांनी 14 हजार 580 मतांनी पराभव केला होता. विशेष म्हणजे 2013 च्या निवडणुकीत रोशन लाल यांनी विजयश्री खेचली होती. सत्ता विरोधी लाटेचा सामना करावा लागत असलेल्या रायगडचा किल्ला राखण्यासाठी यावेळी काँग्रेसला संघर्ष करावा लागत आहे.

The post छत्तीसगडमध्ये काँग्रेस-भाजप काट्याची लढत appeared first on पुढारी.

जांजगीर-चम्पामध्ये यावेळीही चुरस जांजगीर-चम्पा मतदारसंघात गतवेळी मोठी चुरस झाली होती आणि भाजपचे उमेदवार नारायण चंदेल यांनी काँग्रेसच्या मोतीलाल देवांगण यांच्यावर विजय मिळवला होता. त्यावेळी चंदेल यांना 54 हजार मते मिळाली होती, तर देवांगण यांना 50 हजारच्या आसपास मते मिळाली होती. यावेळी काँग्रेसने उमेदवार बदलला आहे. पक्षाने व्यास कश्यप यांना मैदानात उतरविले असून, भाजपकडून गतवेळचे विजेते …

The post छत्तीसगडमध्ये काँग्रेस-भाजप काट्याची लढत appeared first on पुढारी.

Go to Source