धुळे : दुचाकी चोरणाऱ्या टोळक्यातील तिघे पोलिसांच्या जाळ्यात
धुळे- पुढारी वृत्तसेवा-; धुळे जिल्ह्यासह जळगाव , नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातून दुचाकी चोरणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाला यश आले असून पोलीस पथकाने 12 दुचाकी जप्त केल्या असून तिघांना बेड्या ठोकले असल्याची माहिती आज पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे.
शिरपूर तालुक्यातील उंटावद येथे राहणारे रवींद्र सुकलाल पारधी यांची दुचाकी हिसाळे गावाच्या बस स्थानकावरून चोरीस गेली होती. या संदर्भात त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार थाळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासह जिल्ह्यात दुचाकी चोरीचे सत्र पाहता पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची उकल होण्यासंदर्भात सूचना दिल्या. त्यानुसार शिंदे यांच्या उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, सहाय्यक उपनिरीक्षक अमरजीत मोरे तसेच संजय पाटील, संतोष हिरे, पंकज खैरमोडे, शशिकांत देवरे, मुकेश वाघ, प्रशांत चौधरी आदी पथकाने गुप्त माहिती द्वारे माहिती काढली. यात हा गुन्हा सागर शामभाऊ मालचे व त्याचा साथीदार विजय उदय मालचे, आनंद रघुनाथ मोरे, इकबाल हैदर पिंजारी यांनी केल्याची बाब निदर्शनास आली. यातील विजय मालचे व आनंद मोरे गोराने फाट्यावर असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने सागर आणि विजय मालचे व आनंद मोरे यांना ताब्यात घेतले. या चोरट्यांकडून शहादा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीस दिलेली दुचाकी जप्त करण्यात आली. तसेच त्यांनी अन्य पाच दुचाकी त्यांच्या घराजवळून देखील काढून दिल्या. या प्रकरणात जळगाव जिल्ह्यातील मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
त्याचप्रमाणे पथकाने अधिक चौकशी केली असता इकबाल पिंजारी यांच्या घराजवळून अन्य पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या. या प्रकरणात देखील अमळनेर, मालेगाव छावणी, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या चोरट्यांनी शिरपूर तालुक्यातील नागेश्वर येथून चोरी केलेली अन्य दुचाकी त्यांचा मित्र अमर पावरा याला विक्री केल्याचे सांगितले. त्यानुसार ही मोटर सायकल देखील जप्त करण्यात आली. या चोरट्यांकडून एकूण बारा मोटरसायकली जप्त करण्यात आले असून यातील मोटरसायकल चोरीचे सहा गुन्हे उघडकीस आले असून अन्य सहा दुचाकींची चोरी संदर्भात माहिती गोळा करणे सुरू असल्याची माहिती देखील पोलीस अधीक्षक धिवरे यांनी दिली आहे.
हेही वाचा :
नाशिककरांची संकटातून सुटका होईना, आता लवकरच १५ टक्के पाणीकपात
एकटेपणा हा रोज पंधरा सिगारेट ओढण्याइतकाच घातक!
Pune News : फायनान्स कंपन्यांची सावकारी फोफावली !
The post धुळे : दुचाकी चोरणाऱ्या टोळक्यातील तिघे पोलिसांच्या जाळ्यात appeared first on पुढारी.
धुळे- पुढारी वृत्तसेवा-; धुळे जिल्ह्यासह जळगाव , नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातून दुचाकी चोरणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाला यश आले असून पोलीस पथकाने 12 दुचाकी जप्त केल्या असून तिघांना बेड्या ठोकले असल्याची माहिती आज पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे. शिरपूर तालुक्यातील उंटावद येथे राहणारे रवींद्र सुकलाल …
The post धुळे : दुचाकी चोरणाऱ्या टोळक्यातील तिघे पोलिसांच्या जाळ्यात appeared first on पुढारी.