प. बंगालमध्‍ये भाजप उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्‍क: लोकसभेच्‍या सहाव्‍या टप्‍प्‍यासाठी आज ( दि. २५) मतदान होत आहे. दरम्‍यान, पश्चिम बंगालच्या झारग्राममध्ये मतदान केंद्राला भेट देण्‍यासाठी गेलेले भाजप उमेदवार प्रणत तुडू यांच्या ताफ्यावर जमावाने हल्ला केला. या हल्‍ल्‍यात सुरक्षा दलाचे कर्मचारी जखमी झाल्‍याचे वृत्त ‘इंडिया टूडे’ने दिले आहे. तृणमूलच्‍या समर्थकांनी हल्‍ला केल्‍याचा आरोप पश्चिम बंगालमधील पश्चिम मेदिनीपूर आणि पुरुलिया जिल्ह्यांमध्ये …

प. बंगालमध्‍ये भाजप उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क: लोकसभेच्‍या सहाव्‍या टप्‍प्‍यासाठी आज ( दि. २५) मतदान होत आहे. दरम्‍यान, पश्चिम बंगालच्या झारग्राममध्ये मतदान केंद्राला भेट देण्‍यासाठी गेलेले भाजप उमेदवार प्रणत तुडू यांच्या ताफ्यावर जमावाने हल्ला केला. या हल्‍ल्‍यात सुरक्षा दलाचे कर्मचारी जखमी झाल्‍याचे वृत्त ‘इंडिया टूडे’ने दिले आहे.
तृणमूलच्‍या समर्थकांनी हल्‍ला केल्‍याचा आरोप
पश्चिम बंगालमधील पश्चिम मेदिनीपूर आणि पुरुलिया जिल्ह्यांमध्ये असलेल्या झारग्राम राखीव लोकसभा मतदारसंघात आज लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात मतदान होत आहे. भाजप उमेदवार तुडू आणि त्यांचे सुरक्षा कर्मचारी गरबेटा येथील मतदान केंद्राला भेट देत असताना मतदारांना धमकावले जात असल्याची तक्रार त्‍यांच्‍याकडे करण्‍यात आली. यानंतर माझ्‍यासह सुरक्षा कर्मचार्‍यांवर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांनी हल्ला केल्‍याचा आरोप तुडू यांनी केला आहे.
या घटनेचा व्‍हिडिओही व्‍हायरलझाला आहे. यामध्‍ये जमाव दगडफेक करताना आणि भाजप उमेदवार, त्यांच्या सुरक्षा आणि अनेक मीडिया टीमचा पाठलाग करताना दिसत आहे. भाजप नेत्याच्या गाडीचीही तोडफोड करण्यात आली आहे. तुडू हे तृणमूल काँग्रेसचे कालीपदा सोरेन आणि सीपीआय(एम)चे सोनमणी तुडू यांच्याविरुद्ध त्रिपक्षीय लढतीत आहेत.
तृणमूलने आरोप फेटाळले
भाजपने केलेले आरोप तृणमूल काँग्रेसने फेटाळले आहेत. तृणमूलने आरोप केला की, गरबेटा येथील मतदान केंद्राबाहेर मतदान करण्यासाठी रांगेत थांबलेल्‍या महिलेवर तुडू यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्याने हल्ला केला. यामुळे संतप्‍त जमावाने त्‍यांना रोखले.
हेही वाचा :

Abhijit Gangopadhyay : ममता बॅनर्जी यांच्याबद्दल अभद्र टिप्पणी, भाजप उमेदवारावर प्रचारबंदी
‘इंडिया’ आघाडी सरकार आले तर तृणमूलचा ‘बाहेरुन’ पाठिंबा : ममता बॅनर्जी
Lok Sabha election : ममतांना धक्‍का, मतदानापूर्वी ‘तृणमूल’ उमेदवाराची पत्‍नी भाजपमध्‍ये दाखल