धुळ्यात अल्पवयीन मुलांना मद्य विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई

धुळे : पुढारी वृत्तसेवा- पुणे येथील हिट अँड रन प्रकरण गाजत असताना धुळे येथील पोलीस दलाने देखील अल्पवयीन मुलांना मद्य विक्री करणाऱ्या दुकानावर कारवाई करण्याचे सत्र सुरू केले आहे. यासाठी विशेष ड्राईव्ह राबवण्यात आला. यात दोन दुकानांवर अल्पवयीन मुलांना दारूची विक्री होत असल्याची बाब निदर्शनास आल्याने संबंधित पाच जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. …

धुळ्यात अल्पवयीन मुलांना मद्य विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई

धुळे : Bharat Live News Media वृत्तसेवा- पुणे येथील हिट अँड रन प्रकरण गाजत असताना धुळे येथील पोलीस दलाने देखील अल्पवयीन मुलांना मद्य विक्री करणाऱ्या दुकानावर कारवाई करण्याचे सत्र सुरू केले आहे. यासाठी विशेष ड्राईव्ह राबवण्यात आला. यात दोन दुकानांवर अल्पवयीन मुलांना दारूची विक्री होत असल्याची बाब निदर्शनास आल्याने संबंधित पाच जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पुणे येथे मद्याच्या नशेत अल्पवयीन मुलाने धडक दिल्याने दोघां निरपराधांचा जीव गेला. या प्रकरणात संबंधित अल्पवयीन मुलाला दारू उपलब्ध करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात आली. या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. पुण्याच्या या प्रकरणामुळे धुळे येथील पोलीस दलाने देखील विशेष ड्राईव्ह राबवण्यास सुरुवात केली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपाधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांनी या विशेष अभियान अंतर्गत शहरातील दारू विक्री करणाऱ्या दुकानांवर लक्ष केंद्रित केले. शहरातील काही दारू विक्री दुकानांवरून अल्पवयीन मुलांना दारू विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार या दुकानांवर करडी नजर ठेवण्यात आली. दारू विक्री करणाऱ्या दुकानाच्या बाहेर साध्या वेशातील पोलिसांकडून करडी नजर ठेवण्यात आली.
येथे रचला सापळा
या अंतर्गत धुळे शहर उपविभागातील धुळे शहर पोलीस ठाणे हद्दीतील चितोड रोड वरील वाईन शॉप, धुळे महानगर पालिका समोरील वाईन शॉप, चाळीसगांव रोड पोलीस ठाणे हद्दीतील पुनम वाईन शॉप, सत्यम वाईन शॉप, मोहाडी पोलीस ठाण हद्दीतील श्रध्दा वाईन शॉप, राजेश व नियती बिअर-बार, पश्चिम देवपुर पोलीस ठाणे हद्दीतील वाईन सेंटर वाईन शॉप, नकाणे रोड देवपुर पोलीस ठाणे हद्दीतील महाराष्ट्र वाईन शॉप, आझादनगर पोलीस ठाणे हद्दीतील क्वालीटी वाईन शॉप अशा ठिकाणी संबंधीत पोलीस ठाणे येथील अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचला होता.
या विक्रेत्यांवर केली कारवाई
या सापळा कारवाई मध्ये देवपुर पोलीस ठाणे हद्दीतील महाराष्ट्र वाईन शॉप आझाद नगर पोलीस ठाणे हद्दीतील क्वालीटी वाईन शॉप येथील मद्यविक्रेते हे बेकायदेशीरपणे 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना मद्यविक्री करतांना आढळुन आल्याने त्यांच्यावर देवपुर पोलीस ठाणे हददीतील महाराष्ट्र वाईन शॉप येथील चालक जगदीश प्रधानमल गलाणी नोकर ऋतीक भरत शर्मा , मालक विना जगदीश गलाणी यांच्या विरुध्द देवपुर पोलीस ठाणे येथे गुरनं 157/2024 अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा 2015 चे कलम 77, 78 सह महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 चे कलम 82 अन्वये तसेच आझादनगर पोलीस ठाणे हद्दीतील क्वालीटी वाईन शॉप येथील मॅनेजर चुनीलाल मंगतराम सेवाणी , सेल्समन विक्की किशनचंद लुंड यांच्या विरुध्द आझादनगर पोलीस ठाणे येथे अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा 2015 चे कलम 77 प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.
पोलिस अधीक्षकांचा इशारा
अल्पवयीन बालकांच्या संरक्षणाचा कायदा हा अत्यंत कठोर आहे. त्यामुळे अल्पवयीन बालकांना दारूची विक्री करू नये किंवा त्यांना दारू पिण्यासाठी प्रवृत्त करू नये. या प्रकारचे गुन्हे केल्यास संबंधितांवर कठोर स्वरूपाची कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिला आहे.
हेही वाचा –

महेंद्रसिंग धोनीने रांचीत बजावला मतदानाचा हक्क
Cyclone Remal | तीव्र चक्रीवादळ ‘रेमल’ची पश्चिम बंगालच्या किनाऱ्याकडे वाटचाल