छत्तीसगडच्या सुकमात चकमक, एक नक्षली ठार

पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील कोंटा पोलिस स्थानकाच्या हद्दीतील बेलपोचा गावाजवळ सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला. त्याच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरु असल्याची माहिती सुकमाचे पोलिस अधीक्षक किरण चव्हाण यांनी दिली. पोलिस अधीक्षक किरण चव्हाण यांनी या घटनेविषयी माहिती देताना सांगितले की, या …

छत्तीसगडच्या सुकमात चकमक, एक नक्षली ठार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील कोंटा पोलिस स्थानकाच्या हद्दीतील बेलपोचा गावाजवळ सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला. त्याच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरु असल्याची माहिती सुकमाचे पोलिस अधीक्षक किरण चव्हाण यांनी दिली.
पोलिस अधीक्षक किरण चव्हाण यांनी या घटनेविषयी माहिती देताना सांगितले की, या चकमकीत एक नक्षलवादी मारला गेला आणि घटनास्थळावरून एक शस्त्र जप्त करण्यात आले. सध्या या परिसरात शोधमोहीम सुरू आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले.
यापूर्वी १८ मे रोजी सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला होता, असे पोलिसांनी सांगितले. ही घटना तोलनाई व तेत्राई गावांदरम्यानच्या परिसरात घडली होती.
१० मे रोजी पिडिया गावाजवळील जंगलात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली होती. ज्या ठिकाणी सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली ते ठिकाण गंगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते.

Chhattisgarh | One Naxalite was killed in an encounter with security forces near Belpocha village, under Konta PS Limits in Sukma district. Arms and ammunition also recovered. Search operation underway. Further details awaited: Sukma SP Kiran Chavan
— ANI (@ANI) May 25, 2024

हे ही वाचा ;

बांगला देशातील खासदाराच्या हत्येमागे हनी ट्रॅप
ब्रेकिंग | छत्तीसगडमध्ये चकमकीत ८ नक्षलवादी ठार