करण जोहरने बर्थडेला फॅन्सना दिली मोठी भेट, नव्या चित्रपटासह…

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज २५ मे रोजी निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने सिनेजगतातील अनेक सेलिब्रिटींसह फॅन्सनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. यावेळी करण जोहर खास लक्षवेधी ठरला आहे. करण जोहरने फॅन्सना एक मोठी भेट दिली असून इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये लिहिलेले दिसते की, अनटायटल्ड नॅरेशन ड्राफ्ट, …

करण जोहरने बर्थडेला फॅन्सना दिली मोठी भेट, नव्या चित्रपटासह…

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आज २५ मे रोजी निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने सिनेजगतातील अनेक सेलिब्रिटींसह फॅन्सनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. यावेळी करण जोहर खास लक्षवेधी ठरला आहे. करण जोहरने फॅन्सना एक मोठी भेट दिली असून इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये लिहिलेले दिसते की, अनटायटल्ड नॅरेशन ड्राफ्ट, डायरेक्टर करण जोहर २५ मे, २०२४. त्यामुळे अंदाज लावला जात आहे की, करण जोहर नवा चित्रपट घेऊन येत आहे. त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केलीय.
करण जोहरचा बर्थडे बॅश
काल रात्री करणच्या वाढदिवसाला सिनेजगतातील अनेक स्टार्सनी हजेरी लावली. यामध्ये काजोल, नताशा पुनावाला स्पॉट झाले. पण, त्याची बेस्ट फ्रेंड करीना कपूर दिसली नाही. या पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
अधिक वाचा –

Love story Of Hardik-Natasha : नताशाची हार्दिक पांड्याशी कशी झाली होती भेट

इन्स्टाग्रामवरून नव्या चित्रपटाची घोषणा
करणने इन्स्टाग्राम हँडलवरून एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो पांढऱ्या शर्टमध्ये दिसत आहे. फोटोत त्याच्या हातात एक स्पायरल डायरी दिसत आहे. त्यावर लिहिलेले दिसते की, ‘अनटायटल्ड नॅरेशन ड्राफ्ट, डायरेक्टर करण जोहर २५ मे, २०२४.’ हा फोटो शेअर करताना त्याने रेड हार्ट इमोजीसह लिहिले, ‘गेट… सेट…गो.
अधिक वाचा –

अनसूया सेनगुप्ताचा Cannes मध्ये डंका, जिंकला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

फॅन्सना उत्सुकता आहे की, त्याच्या आगामी चित्रपटाची कथा काय असेल. शिवाय कलाकार कोण असतील, याबाबतही सोशल मीडिया युजर्सनी कॉमेंटमध्ये प्रश्न विचारले आहेत. तर काहींना वाटते की, तो शाहरूख आणि काजोलला घेऊन चित्रपट आणत आहे. पण, करणकडून याबाबत कोणतेही माहिती समोर आलेली नाही.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये करण जोहरने शाहरुख आणि काजोलसोबत पुन्हा काम करण्याची घोषणा केली होती. त्ामुळे कयास लावला जात आहे की, तचो या स्टार जोडीला सोबत घेऊन नवा चित्रपट बनवेल.
अधिक वाचा –

Heeramandi : परफेक्शन नसल्यामुळे भन्साळींनी फटकारलं, नाचताना रडली ऋचा चड्ढा

 

View this post on Instagram

 
A post shared by Karan Johar (@karanjohar)