Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : एक मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून नताशा स्टॅनकोविकने कलाविश्वात पदार्पण केले. ‘सत्याग्रह’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश झा यांचा होता. नताशा ही सर्बियन अभिनेत्री, मॉडेल आणि डान्सर आहे. भारतात तिला बिग बॉसच्या ८व्या सीझन आणि ‘बादशाह’मधील ‘डीजे वाले बाबू’ या गाण्याने लोकप्रियता मिळाली होती. तुम्हाला माहितीये का, हार्दिक आणि नताशा यांची भेट कशी झाली होती?
नताशा २०१२ मध्ये आली भारतात
अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी नताशा २०१२ मध्ये भारतात आली होती. फिलिप्स, कॅडबरी आणि जॉन्सन अँड जॉन्सन यांसारख्या ब्रँडसह तिने मॉडेल म्हणून सुरुवात केली होती. २०१३ मध्ये ‘या’ सर्बियन मॉडेलला सत्याग्रह या चित्रपटाद्वारे पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला. अमिताभ बच्चन, अजय देवगन आणि करीना कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात नताशाने ‘आयो जी’ हा आयटम नंबर केला होता.
अधिक वाचा-
Hardik Pandya Divorce: हार्दिक पांड्याच्या संपत्तीचा ७० टक्के हिस्सा मिळणार नताशाला?
नताशा बिग बॉसमधून मिळाली ओळख
नताशा स्टॅनकोविचला प्रसिद्ध रॅपर बादशाहच्या म्युझिक व्हिडिओ ‘गन’ मध्ये (२०१४) भूमिका मिळाली. त्याच वर्षी तिला टीव्हीवरील वादग्रस्त शो ‘बिग बॉस’च्या घरात महिनाभर राहण्याची संधी मिळाली. मात्र, या अभिनेत्रीने बादशाहच्या ‘डीजे वाले बाबू’ या ब्लॉकबस्टर गाण्याने देशात आणि जगात प्रसिद्धी मिळवली.
दोन वर्षांनंतर, म्हणजेच २०१६ मध्ये, नताशाला सौरभ वर्मा दिग्दर्शित ‘७ अवर्स टू गो’ मध्ये महिला पोलिसाची भूमिका देण्यात आली. २०१७ मध्ये तिने ‘फुक्रे रिटर्न्स’मध्ये ‘मेहबूबा’ डान्स नंबर केला. ज्यासाठी तिचे खूप कौतुक झाले. नंतर तिला सुपरस्टार शाहरुख खान, कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा स्टारर ‘झिरो’ मध्ये छोटी भूमिका मिळाली.
अधिक वाचा-
Heeramandi : परफेक्शन नसल्यामुळे भन्साळींनी फटकारलं, नाचताना रडली ऋचा चड्ढा
वेबसीरीजमध्येही काम
नताशा गेल्या वर्षी आलेल्या ‘द हॉलिडे’ या वेब सीरिजमध्येही दिसली होती. रिॲलिटी डान्स शो ‘नच बलिए’मध्ये नताशा तिचा पार्टनर अली गोनीसोबत डान्स करतानाही दिसली होती. हार्दिक आणि नताशाची भेट एका नाईट क्लबमधून झाली होती. येथून दोघांच्या लव्ह स्टोरीला सुरुवात झाली होती. त्यानंतर हार्दिकने नताशासोबतचा एक रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करून नात्याची कबुली दिली होती. नंतर दोघांनी लग्न केले. साखरपुड्याचे खूप सुंदर आणि रोमँटिक फोटोदेखील हार्दिकने शेअर केले होते.
अधिक वाचा-
अनसूया सेनगुप्ताचा Cannes मध्ये डंका, जिंकला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
View this post on Instagram
A post shared by @natasastankovic__