बिग बीही थक्क! KBC ज्युनिअर्स वीक’ मध्ये मयंकने जिंकले १ कोटी
पुढारी ऑनलाईन डेस्क : महेंद्रगड, हरियाणाचा मयंक सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती 15 च्या ‘KBC ज्युनिअर्स वीक’ मध्ये 1 कोटी पॉईंट जिंकणारा सर्वात लहान मुलगा ठरला. सर्व प्रश्नांची सहजपणे उत्तरे देऊन त्याने तयारी, आत्मविश्वास आणि चिकाटीचे मोल दाखवून दिले आणि विक्रमी 1 कोटी पॉइंट कमावले. इतकेच नाही, तर त्याने या कार्यक्रमाचे होस्ट अमिताभ बच्चन यांना प्रभावित केले.
संबंधित बातम्या –
IFFI 2023 Goa : गोल्डन पिकॉक पुरस्काराचे नामांकन ‘कांतारा’ टीमसाठी अभिमानास्पद : ऋषभ शेट्टी
Kal Ho Naa Ho ची २० वर्षे; आठवणींनी करण जोहर भावूक
IFFI 2023 : कुटुंबाच्या पाठिंब्यामुळेच अभिनय क्षेत्रात-अभिनेत्री शेफाली नाईक
चक्रावून गेलेल्या बिग बींनी मयंकच्या आईवडिलांना मयंकच्या विविध विषयातील असामान्य ज्ञानाविषयी विचारले. त्यावर त्यांनी मजेदार पद्धतीने मयंकला ज्ञानाबद्दल असामान्य रुची असल्याची कबुली दिली. शिक्षणाच्या बाबतीतील त्याची कामगिरी कशी नेहमी अभिमानास्पद असते आणि विविध विषयांत त्याला कशी गती आहे तसेच आपण त्याच्या जिज्ञासेचे निराकरण करण्यासाठी कसे प्रयत्न करतो, हे त्यांनी सांगितले.
मयंक एक हुशार मुलगा आहे आणि KBC च्या मंचाच्या माध्यमातून त्याने यशस्वीरित्या नावलौकिक मिळवला. आपल्या यशविषयी तो म्हणतो, “KBC ज्युनिअर्स वीकमध्ये माझी हुशारी दाखवण्याची आणि अमिताभ बच्चनसमोर बसून खेळण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य मानतो. अमिताभ सरांनी मला सतत प्रोत्साहित केले. एवढी मोठी रक्कम जिंकणारा सर्वात लहान स्पर्धक ठरल्याबद्दल मला आणि माझ्या कुटुंबियांना अभिमान वाटतो. आम्ही सगळे या कार्यक्रमाचे आणि बच्चन सरांचे चाहते आहोत. मला निरंतर मार्गदर्शन देणाऱ्या, उत्तम कामगिरी करण्यासाठी मदतरूप ठरणाऱ्या आणि 1 कोटीची मजल गाठण्यास प्रेरित करणाऱ्या माझ्या आई-वडिलांना मी धन्यवाद देतो.”
The post बिग बीही थक्क! KBC ज्युनिअर्स वीक’ मध्ये मयंकने जिंकले १ कोटी appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : महेंद्रगड, हरियाणाचा मयंक सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती 15 च्या ‘KBC ज्युनिअर्स वीक’ मध्ये 1 कोटी पॉईंट जिंकणारा सर्वात लहान मुलगा ठरला. सर्व प्रश्नांची सहजपणे उत्तरे देऊन त्याने तयारी, आत्मविश्वास आणि चिकाटीचे मोल दाखवून दिले आणि विक्रमी 1 कोटी पॉइंट कमावले. इतकेच नाही, तर त्याने या कार्यक्रमाचे होस्ट अमिताभ बच्चन …
The post बिग बीही थक्क! KBC ज्युनिअर्स वीक’ मध्ये मयंकने जिंकले १ कोटी appeared first on पुढारी.