भेटा पप्पू चायवाल्याला; दुधाच्या पिशव्या ढगात.. अन् चहा कपात…
Bharat Live News Media ऑनलाईन ; Pappu Chaiwala : तुम्ही जर सोशल मीडिया वापरत असाल तर तुम्हाला डॉली चायवाला नक्कीच माहिती असेल. जो त्याच्या हटके हेअर स्टाईल आणि नाविण्यपूर्ण चहा करण्याच्या पद्धतीमुळे वर्ल्ड फेमस झाला. मात्र आता एक नवा चहावाला आला आहे. त्याचे नाव आहे पप्पू चायवाला. जसे डॉली चहावाला अनेक स्टाईल दाखवून चहा बनवतो तसाच पप्पू चहावालाही अनेक करतब दाखवून चहा बनवतो. तुम्ही याचा व्हिडिओही पाहू शकता त्याचा अंदाज थोडा निराळा आहे. त्याच्या या जगावेगळ्या अंदाजामुळे तो आज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ॲक्शनमध्ये चहा बनवणारा पप्पू चहावाल्याचा व्हिडिओ व्हायरल
पप्पू चायवालाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात फिरत आहे. foodie_.life नावाच्या अकाऊंटवरून पप्पू चायवालाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये एक काका पप्पू चायवालाच्या टपरीवर अगदी अनोख्या पद्धतीने चहा बनवताना दिसत आहेत. काका आधी दुधाचे पाकीट हवेत फेकतात आणि नंतर ते पाकिट फाडून दूध बाहेर काढतात आणि उंचावरून चहाच्या भांड्यात ओततात. यानंतर दूधात दोन ते तीन प्रकारचे मसाले यामध्ये गवती चहा, पुदीना, चहा पावडर ,साखर आणि आले टाकतो. यानंतर आणखी काही स्पेशल जीन्नसही त्यात टाकतो. यानंतर बनतो पप्पूचा स्पेशल चहा.
व्हिडिओला 40 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत
शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पप्पू चायवालाबद्दल काही माहिती देण्यात आली आहे. ज्यामध्ये काकांच्या चहाच्या दुकानाचे नाव ‘पप्पू चायवाला’ असे लिहिले आहे आणि ते सुरतच्या न्यू सिटी लाइट रोडवर त्यांचे दुकान थाटतात. ॲक्शनसोबत चहा बनवण्याची त्याची स्टाइल पाहून लोक त्याला ॲक्शन चायवाला म्हणूनही संबोधत आहेत. पप्पू चायवालाचा व्हिडिओ 4 कोटी लोकांनी पाहिला आहे आणि 11 लाख लोकांनी त्याला लाईक केले आहे.
हेही वाचा :
ब्रेकिंग! प्रतीक्षा संपली! राज्याचा दहावीचा निकाल २७ मे रोजी
पोर्शे कार अपघात प्रकरण : पुणे आयुक्तांनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले…
Cyclone Remal | तीव्र चक्रीवादळ ‘रेमल’ची पश्चिम बंगालच्या किनाऱ्याकडे वाटचाल