पोर्शे अपघात प्रकरण : पुणे आयुक्तांनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले…

पुढारी ऑनलाईन डेस्क :  पोर्शे कार अपघात प्रकरणातील आपल्‍या नातवाला वाचविण्‍यासाठी सुरेंद्रकुमार अग्रवाल याने ड्रायव्हर गंगाराम पुजारी याला दाेन दिवस डांबून ठेवले. तु जर खर बोललास जर तुला बघून घेईन अशी धमकीही दिली,  अशी धक्कादायक माहिती आज (दि.२५मे) पुणे पाेलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Pune porsche accident) काय म्हणाले पोलिस आयुक्त? पुण्यातील …

पोर्शे अपघात प्रकरण : पुणे आयुक्तांनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले…

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क :  पोर्शे कार अपघात प्रकरणातील आपल्‍या नातवाला वाचविण्‍यासाठी सुरेंद्रकुमार अग्रवाल याने ड्रायव्हर गंगाराम पुजारी याला दाेन दिवस डांबून ठेवले. तु जर खर बोललास जर तुला बघून घेईन अशी धमकीही दिली,  अशी धक्कादायक माहिती आज (दि.२५मे) पुणे पाेलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Pune porsche accident)
काय म्हणाले पोलिस आयुक्त?

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आजोबांनी कार चालकाला डांबून ठेवले.
तु जर खर बोललास तर तुला बघून घेईन अशी धमकी ड्रायव्हर गंगाराम पुजारी याला दिली.
आजोबांवर अपहरण आणि धमकीचा गुन्हा दाखल झाला आहे

तू जर खर बोललास तर…
पत्रकार परिषदेत पुणे पाेलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, तू जर खर बोललास जर तुला बघून घेईन, अशी धमकी संशयित अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल याने कार  ड्रायव्हर गंगाराम पुजारी याला दिली.  गंगाराम पुजारी याला दोन दिवस घरी न पाठवता तब्बल ४८ तास डांबून ठेवेल. आपल्या नातवारील आरोप स्वत:वर घे असा दबाव आणला.  आरोप स्‍वत:वर घेतले नाहीस आणि तू जर खर बोललास जर तुला बघून घेईन. अशी धमकीही त्‍याला दिली.” Pune porsche accident)

#WATCH | Pune car accident case: Pune CP Amitesh Kumar says, “When the driver was first brought to the Police Station from the spot, the first statement which he gave in writing was that he was driving the car. But the Police Station at that point of time disbelieved the… pic.twitter.com/I4xgJry7H0
— ANI (@ANI) May 25, 2024

काय आहे पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण?
मद्यधुंद अल्पवयीन मुलाने भरधाव पोर्श कारने चालवत रविवारी (दि.१९) पुण्यातील दाेन आयटी इंजिनिअरला चिरडले. अश्विनी कोस्टा व अनिस अवधिया असे मृत तरुण-तरुणीचे नाव आहे. अश्विनी ही मूळची मध्य प्रदेशमधील जबलपूर येथील आहे. तर अनिसची आई-वडील वृद्ध असून, अनिस हा त्यांचा एकमेव मुलगा होता. दोघांनीही त्यांचे कम्प्युटर सायन्सचे शिक्षण पूर्ण केले होते.
दरम्यान अल्पवयीन संशयित आरोपीने पाेलिसांना सांगितले आहे की, मी दारु पीत असल्‍याचे वडिलांना माहित होते. त्यांनीच मला कार दिली. या प्रकरणी दाखल गुन्‍ह्यात नमूद करण्‍यात आलं आहे की, “आरोपीकडे वैध वाहन परवाना आणि कार चालवण्याचे वैध प्रशिक्षण नाही, हे माहित असुनही त्याच्या वडिलांना त्याला कार चालवायला दिली होती. त्याचबरोबर त्याला पार्टी करायला परवानगीही दिली होती. आरोपीचे वडिल यांच्यासह चारजणांना अटक केली आहे.  Pune’s killer Porsche

#WATCH | Pune car accident case: Pune CP Amitesh Kumar says, “The in-charge PI and one other officer have been placed under suspension and departmental proceedings have been initiated for primary lapses in the overall conduct of this preliminary initial phase of the investigation… pic.twitter.com/d3q3kn73IS
— ANI (@ANI) May 25, 2024

हेही वाचा 

Pune Porsche Car Accident | पुणे अपघात- पोर्शे कार १६० किमी प्रतितास वेगाने धडकली
Pune Porsche Car Accident | ‘ही हत्या आहे, अपघात नाही’, पुणे अपघातातील मृत अभियंत्याच्या कुटुबियांची तीव्र प्रतिक्रिया
पोर्शे कार अपघात : पुण्याच्या व्यावसायिकाला संभाजीनगरातून अटक