मातीच्या भांड्यात जेवण बनवण्याचे फायदे

छत्रपती संभाजीनगर : आजच्या धावपळीच्या जगात सकस आहाराकडे लक्ष देण्यास अनेकांना वेळ नसल्याने शरीरास योग्य प्रमाणात पोषण मिळत नाही. त्यामुळे किमान अन्न पदार्थ योग्यप्रकारे तसेच योग्य भांड्यात शिजवल्यास शरीरास काही प्रमाणात का होईना योग्य पोषण मिळवण्यासाठी जेवण बनिवतांना नेहमीच्या अॅल्युमिनियमच्या किंवा स्टीलच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक बनविण्यापेक्षा मातीची भांडी (Clay pots cooking benefits) वापरल्यास आरोग्यास ते लाभदायक …

मातीच्या भांड्यात जेवण बनवण्याचे फायदे

छत्रपती संभाजीनगर : आजच्या धावपळीच्या जगात सकस आहाराकडे लक्ष देण्यास अनेकांना वेळ नसल्याने शरीरास योग्य प्रमाणात पोषण मिळत नाही. त्यामुळे किमान अन्न पदार्थ योग्यप्रकारे तसेच योग्य भांड्यात शिजवल्यास शरीरास काही प्रमाणात का होईना योग्य पोषण मिळवण्यासाठी जेवण बनिवतांना नेहमीच्या अॅल्युमिनियमच्या किंवा स्टीलच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक बनविण्यापेक्षा मातीची भांडी (Clay pots cooking benefits) वापरल्यास आरोग्यास ते लाभदायक ठरते.
पुन्हा मातीच्या भांड्यांची क्रेज…

मातीची भांड्यात जेवण अधिक पौष्टिक आणि स्वादिष्ट बनते.
दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी मातीची भांडी सर्वांत जास्त उपयुक्त असतात.
मातीच्या भांड्यातून पोषक तत्त्वे मिळण्यास मदत होते.
वारंवार पोटात गॅस होत असेल तर आवर्जून मातीच्या भांड्यात शिजवलेले अन्न खावे.

स्टील, पितळ आणि अॅल्युमिनियमच्या भांड्यांची चलती असतानाही मातीच्या भांड्यांचीही (Clay pots cooking benefits) क्रेझ कायम आहे. मातीच्या भांड्यात जेवण केल्याने आरोग्यासाठी फायदा होतो. आयुर्वेदानुसार जर भोजन पौष्टिक आणि स्वादिष्ट बनवायचे असेल तर ते हळूहळू शिजवले पाहिजे. मातीच्या भांड्यात जेवण तयार होण्यासाठी वेळ थोडा जास्त लागतो, परंतु आरोग्याला त्यापासून पूर्ण लाभ होतो. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी मातीची भांडी सर्वांत जास्त उपयुक्त असल्याने शंभर टक्के पोषण तत्त्वे मिळतात. मातीच्या भांड्यांमध्ये बनवलेले जेवण अधिक पौष्टिक आणि स्वादिष्ट लागते. मातीच्या तव्यावर चपाती करताना मातीचे तत्त्व चपातीमध्ये शोषले जाते, यामुळे त्याची पौष्टिकता वाढते. तर वारंवार पोटात गॅस होत असतील तर आवर्जून मातीच्या भांड्यात शिजवलेले अन्न खावे.
प्रत्येक व्यक्तीच्या शरीराला साथारणपणे १८ पोषक तत्त्वांची गरज असते. मातीच्या भांड्यातून ही पोषक तत्त्वे मिळण्यास मदत होते, असे आहारतज्ज्ञांचे म्हणणे आहे. ग्रामीण भागात काही वर्षापुर्वी मातीची भांडी रोजच्या जिवनात वापरण्याचे प्रमाण होते. त्यातून आवश्यक पोषक तत्वे त्यांना सहज मिळत असल्याने आरोग्य देखील चांगले राहत होते. पितळी भांडी देखील मोठ्या प्रमाणात वापरली जात असे. त्यांची जागा स्टिलच्या भांड्यांनी घेतली. आता परत एकदा मातीच्या भांड्यांत स्वयंपाक बनविण्याची क्रेज तयार होत आहे.
हेही वाचा : 

काळ्या रंगाचे गाजर ठरते अधिक गुणकारी
‘या’ आहारातून मिळते व्हिटॅमिन ‘डी’
चक्क टोमॅटो घालून बनवले आईस्क्रीम!