पोर्शे अपघात प्रकरण; संशयीत आरोपीच्या आजोबाला अटक
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना पोलिसांनी अटक केली आहे. सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune porsche accident)
काय आहे प्रकरण?
पुण्यात रविवारी (दि.१९) पहाटे भऱधाव पोर्शे कारने दुचाकीला धडक दिली, यात तरुण-तरुणी ठार
संशयीत आरोपी अल्पवयीन; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांचा मुलगा
मुलाकडे वाहन परवाना नसताना वडिलांनी पोर्शे कार चालवायला दिली होती. वडिलांनाही अटक
आरोपीचे आजोबा यांनाही पोलिसांनी अटक केली
ड्रायव्हरला कोंडून ठेवून धमकी
पोर्शे अपघात प्रकरणातील मुख्य संशयित आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनी संशयित आरोपीच्या गाडीच्या ड्रायव्हरला धमकावल्या प्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचे आजोबा सुरेंद्र यांनी घटनेतील ड्रायव्हरला कोंडून ठेवले आणि अपघाताची जबाबदारी घेण्यासाठी धमकावले. पोलिसांनी त्यांच्यावर अपहारणाचा गुन्हा दाखल केला आहे.
वडिलांसह पाच जणांवर गुन्हा
मद्यधुंद अल्पवयीन मुलाने भरधाव पोर्श कारने चालवत रविवारी (दि.१९) पुण्यातील दाेन आयटी इंजिनिअरला चिरडले. अल्पवयीन आरोपीने पाेलिसांना सांगितले आहे की, मी दारु पीत असल्याचे वडिलांना माहित होते. त्यांनीच मला कार दिली. या प्रकरणी दाखल गुन्ह्यात नमूद करण्यात आलं आहे की, “आरोपीकडे वैध वाहन परवाना आणि कार चालवण्याचे वैध प्रशिक्षण नाही, हे माहित असुनही त्याच्या वडिलांना त्याला कार चालवायला दिली होती. त्याचबरोबर त्याला पार्टी करायला परवानगीही दिली होती. आरोपीचे वडिल यांच्यासह चारजणांना अटक केली आहे. Pune’s killer Porsche
कुटुंबीयांचा आक्रोश
पुणे अपघातातील अश्विनी कोस्टा व अनिस अवधिया यांच्या कुटुंबीयांनी मुलांचे मृतदेह पाहताच आक्रोश केला. अश्विनी ही मूळची मध्य प्रदेशमधील जबलपूर येथील आहे. तर अनिसची आई-वडील वृद्ध असून, अनिस हा त्यांचा एकमेव मुलगा होता. दोघांनीही त्यांचे कम्प्युटर सायन्सचे शिक्षण पूर्ण केले होते. या अपघाताने दोघांते नातेवाईक हादरले आहेत. Pune’s killer Porsche
ही हत्या आहे, अपघात नाही
अनिशचे आजोबा आत्माराम अवधिया म्हणाले की, पुण्यातील प्रख्यात बिल्डरचा मुलगा किशोर ड्रायव्हरला जामीन मिळायला नको होता. “या अपघातात दोन जणांचा जीव गेला, हे पूर्णपणे चुकीचे आहे. या अपघातातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, असे आमचे मत आहे. त्यामुळे आरोपींना दिलेला जामीन रद्द करण्यात यावा,” अशी इच्छा मृत अनिश याच्या आजोबांनी व्यक्त केली आहे. अनिसचे काका अखिलेश अवधिया म्हणाले, “अल्पवयीन आरोपी मद्यधुंद अवस्थेत होता आणि ताशी २४० किमी वेगाने गाडी चालवत होता. त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नव्हते. त्यामुळे ‘ही हत्या आहे, अपघात नाही.”
हेही वाचा
Pune Porsche Car Accident | पुणे अपघात- पोर्शे कार १६० किमी प्रतितास वेगाने धडकली
Pune Porsche Car Accident | ‘ही हत्या आहे, अपघात नाही’, पुणे अपघातातील मृत अभियंत्याच्या कुटुबियांची तीव्र प्रतिक्रिया
पोर्शे कार अपघात : पुण्याच्या व्यावसायिकाला संभाजीनगरातून अटक