Pune Crime News : कोयत्याने वार करून तरुणाचा निर्घृण खून
पुणे : पुढारी वृत्तसेवा : बकोरी रोड वाघोली परिसरात एका तरुणाचा मंगळवारी (दि. 28) दुपारी कोयत्याने सपासप वार करून खून करण्यात आला. महेश डोके (वय 21) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो बीजीएस कॉलेज, वाघोली येथे बीबीएच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असून, वाडेबोल्हाई येथील एका वसतिगृहात वास्तव्यास होता. दरम्यान डोके याचा खून नेमक्या कोणत्या कारणातून झाला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. त्याच्याच ओळखीतील संशयित व्यक्तीने हा खून केल्याचा अंदाज आहे.
याप्रकरणी, कृष्णकांत कमलेशकुमार यादव (वय 30, रा. आरव ब्लीस सोसायटी, राधेश्वरीनगरी बकोरी रोड वाघोली) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 28) दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली आहे.b पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यादव हे राधेश्वरनगरी बकोरी रोड येथे वास्तव्यास आहेत. मंगळवारी दुपारी घरी असताना, घराच्या खिडकीत बसून मोबाईल पाहत होते. त्या वेळी त्यांना एका व्यक्तीचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज आला.
त्यांनी खिडकीतून पाहिले तेव्हा एक तरुण दुसर्या तरुणाच्या पाठीमागे हातात कोयता घेऊन पळताना दिसून आला. समोर पळणार्या तरुणाच्या अंगावर बरेच रक्त सांडलेले दिसले. त्यांनी खाली उतरून जोरात आवाज दिला. त्या वेळी कोयत्याने मारहाण करणारा तरुण दुचाकीवरून पळून गेला. आरोपीने केलेल्या हल्ल्यात डोके गंभीर जखमी झाला होता. रक्ताने त्याचे अंग माखले होते. यादव यांनी त्यांच्या अंगातील शर्ट काढून डोके याची जखम बांधली. त्यानंतर रुग्णवाहिकेला फोन केला. तेवढ्यात अन्य एका व्यक्तीच्या मदतीने रिक्षातून डोके याला खासगी रुग्णालयात दाखल केले.
यादव यांना डोके याने आपले नाव सांगून, त्याच्या ओळखीतील एका व्यक्तीने आपल्याला मारल्याचे सांगितले. डोके याची स्थिती गंभीर असल्याचे पाहून, तेथील डॉक्टरांनी त्याला ससून रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. ससून रुग्णालयात डोके याला दाखल करण्यात आल्यावर डॉक्टरांनी तपासले असता, त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी आणि ससून रुग्णालयात भेट दिली. यादव यांनी सांगितलेल्या वर्णनावरून संशयित आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत. त्याला अटक करण्यात आल्यानंतर डोके याचा खून कोणत्या कारणातून झाला हे समोर येईल. पुढील तपास लोणीकंद पोलिस करीत आहेत.
बकोरी रोड वाघोली येथे मंगळवारी दुपारी एका तरुणाचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत. आरोपीला अटक केल्यानंतरच तरुणाचा खून कोणत्या कारणातून झाला हे स्पष्ट होईल.
– विश्वजित काईंगडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लोणीकंद
हेही वाचा
नाशिककरांची संकटातून सुटका होईना, आता लवकरच १५ टक्के पाणीकपात
राज्यसेवा परीक्षा : वैद्यकीय तपासणी आता मुलाखतीच्या टप्प्यावर
Nashik News : मनसेने इंग्रजी पाट्यांना फासले काळे
The post Pune Crime News : कोयत्याने वार करून तरुणाचा निर्घृण खून appeared first on पुढारी.
पुणे : पुढारी वृत्तसेवा : बकोरी रोड वाघोली परिसरात एका तरुणाचा मंगळवारी (दि. 28) दुपारी कोयत्याने सपासप वार करून खून करण्यात आला. महेश डोके (वय 21) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो बीजीएस कॉलेज, वाघोली येथे बीबीएच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असून, वाडेबोल्हाई येथील एका वसतिगृहात वास्तव्यास होता. दरम्यान डोके याचा खून नेमक्या कोणत्या …
The post Pune Crime News : कोयत्याने वार करून तरुणाचा निर्घृण खून appeared first on पुढारी.