लोकसभा निवडणूक सहावा टप्पा- सकाळी ९ पर्यंत १०.८२ टक्के मतदान
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: लोकसभेच्या सहाव्या टप्प्यातील निवडणूक मतदान प्रक्रिया (Lok Sabha election) आज (दि.२५) पार पडत आहे. देशातील ७ राज्ये आणि १ केंद्रशासित प्रदेशातील (जम्मू-काश्मीर) ५८ जागांवर मतदान सुरू झाले आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत १०.८२ टक्के मतदान झाले आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.
देशातील ७ राज्यांमध्ये निवडणुकीच्या 6व्या टप्प्यात सकाळी ९ वाजेपर्यंत एकूण १०.८२ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये (Lok Sabha election)पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक १६.५४ टक्के तर ओडिसामध्ये सर्वात कमी ७.४३ टक्के मतदान झाले आहे. याशिवाय बिहार-९.६६ टक्के, हरियाणा-८.३१ टक्के, जम्मू-काश्मीर-८.८९ टक्के, झारखंड-११.७४ टक्के, दिल्ली-८.९४ टक्के, उत्तर प्रदेश १२.३३ टक्के मतदान झाले आहे.
#LokSabhaElections2024 | 10.82% voter turnout recorded till 9 am, in the 6th phase of elections.
Bihar- 9.66%
Haryana- 8.31%
Jammu & Kashmir- 8.89%
Jharkhand- 11.74%
Delhi- 8.94%
Odisha- 7.43%
Uttar Pradesh-12.33
West Bengal- 16.54% pic.twitter.com/puEJqCel7o
— ANI (@ANI) May 25, 2024
Lok Sabha election: आकडे बोलतात
६व्या टप्प्यात ८८९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
७९७ पुरुष आणि ९२ महिला उमेदवार आहेत. १,२४१ कोटी रुपयांच्या संपत्तीसह हरियाणातील कुरुक्षेत्र मतदारसंघाचे भाजप उमेदवार नवीन जिंदाल या टप्प्यातील सर्वांत श्रीमंत उमेदवार आहेत.
५४३ मतदारसंघांपैकी पाचव्या टप्प्यापर्यंत
४२९ जागांवर मतदान झाले आहे.
२५ मेपर्यंत एकूण ४८७ जागांवर मतदान पूर्ण होईल. ७व्या आणि शेवटच्या टप्प्यात ५६ जागांवर मतदान होईल.
१८३ उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत.
३९ टक्के उमेदवार कोट्यधीश आहेत. त्यात भाजपचे सर्वाधिक ४८ उमेदवार.
हेही वाचा:
Lok Sabha Election 2024 : लोकसभेच्या सहाव्या टप्प्याचे मतदान सुरू
Nashik Lok Sabha Election 2024 | वाढला टक्का, कोणाला धक्का?
Nashik Lok Sabha Election 2024: परदेशातून येत बजावला मतदानाचा हक्क