सिन्नर घोटी महामार्गावर वाहनाच्या धडकेत कोल्हा ठार
सिन्नर(जि. नाशिक) : Bharat Live News Media वृत्तसेवा सिन्नर घोटी महामार्गावर सोनांबे शिवारात आई भवानी डोंगराजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत कोल्हा ठार झाल्याची घटना घडली.
दुष्काळी परिस्थितीमुळे जंगल परिसरातील जलस्रोत असल्याने जंगली श्वापद अन्न आणि पाण्याच्या शोधात नागरी वस्तीकडे धाव घेताना दिसत आहे. सिन्नर तालुक्यात नागरी वस्त्यांवर बिबट्यांचा वावर तसेच नागरिकांवर हल्ले या घटना नित्याच्या झाल्या आहेत. आता अन्न आणि पाण्याच्या शोधात हिंडणाऱ्या जंगली श्वापदांना प्राण देखील गमावावे लागत असल्याचे समोर येत आहे.
सिन्नर येथील वनप्रस्थ फाउंडेशनचे स्वयंसेवक आई भवानी डोंगर परिसरात वृक्ष लागवड व संवर्धनाचे कार्य करीत आहेत. बरेच स्वयंसेवक वेळ मिळेल तसे सकाळच्या सुमारास येथे श्रमदान करतात. नेहमीप्रमाणे शनिवारी (दि. 25) सकाळच्या सुमारास स्वयंसेवक आई भवानी डोंगराजवळ पोहोचत असताना त्यांना सिन्नर- घोटी महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेला कोल्हा बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्यांनी पशुवैद्यकास तपासणीसाठी बोलावले. मात्र कोल्ह्याचा जागीच मृत्यू झालेला होता.
याबाबत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली.
हेही वाचा –
सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राचा संशोधकांना सापडला स्रोत
Nashik News | हाणामारी करणारे दोघे शिक्षक निलंबीत, नेमकं प्रकरण काय?