दत्ता दळवींचा गुन्हा काय, अटक का केली? संजय राऊत यांचा हल्लाबोल
पुढारी ऑनलाईन डेस्क : दत्ता दळवींचा गुन्हा काय, अटक का केली? असा हल्लाबोल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दळवी यांच्या अटकेनंतर खा. संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित करत हल्लाबोल केला. संजय राऊत यांनी भांडूप पोलिस स्थानकाबाहेरून माध्यमांशी संवाद साधला.
संबंधित बातम्या-
मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवींना अटक; मुख्यमंत्र्यांविरोधात शिवीगाळ केल्याचा आरोप
Uttarkashi Tunnel Rescue | अरनॉल्ड डिक्स कोण आहेत? जे ४१ कामगारांच्या सुटकेसाठी बाबा बौख नाग देवतेसमोर झाले होते नतमस्तक
क्लार्कच्या एका चुकीमुळे ‘तो’ झाला कोट्यधीश!
भांडुपमध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे.
खा. राऊत म्हणाले, ‘शिंदे म्हणजे गद्दर उदयसम्राट आहेत. शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल व्हायला हवा. गद्दार स्वत:ला हृदयसम्राट म्हणवतात. महाराष्ट्रातील अवकाळी पाऊस, त्यातू निर्माण झालेली परिसथिती, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून हे गद्दार राजकारण करताहेत.’ राऊत पुढे म्हणाले, ‘धर्मवीर सिनेमात शिव्या आहेत, त्यावेळी गुन्हा दाखल केला का. सुळेंनी शिव्या देणाऱ्या सत्तारांवर गुन्हा दाखल केला होता का? सुप्रिया सुळेंना शिव्या देणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला का? मग दळवींचा काय गुन्हा? त्यांना अटक का केली?’
The post दत्ता दळवींचा गुन्हा काय, अटक का केली? संजय राऊत यांचा हल्लाबोल appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : दत्ता दळवींचा गुन्हा काय, अटक का केली? असा हल्लाबोल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दळवी यांच्या अटकेनंतर खा. संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित करत हल्लाबोल केला. संजय राऊत …
The post दत्ता दळवींचा गुन्हा काय, अटक का केली? संजय राऊत यांचा हल्लाबोल appeared first on पुढारी.