केजरीवालांकडून पीएला वाचवण्याचा प्रयत्न, भाजपचा आरोप

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा :  स्वाती मालीवाल प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडून स्वीय सहाय्यक विभव कुमार यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले की, खासदार स्वाती मालीवाल प्रकरणात केजरीवाल यांच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज गायब झाले. विभव कुमारचा फोन फॉरमॅट करण्यात …

केजरीवालांकडून पीएला वाचवण्याचा प्रयत्न, भाजपचा आरोप

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा :  स्वाती मालीवाल प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडून स्वीय सहाय्यक विभव कुमार यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले की, खासदार स्वाती मालीवाल प्रकरणात केजरीवाल यांच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज गायब झाले. विभव कुमारचा फोन फॉरमॅट करण्यात आला.
विभव कुमारच्या फोनमधील माहितीवरून या प्रकरणाचे सत्य बाहेर आले असते. खासदार स्वाती मालीवाल यांना मारहाण झाली असताना त्यांच्यामागे उभे राहण्याऐवजी केजरीवाल विभव कुमारला वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे भाटिया यांनी सांगितले.
हेही वाचा 

Delhi AAP : स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण ; केजरीवालांच्या आई-वडिलांची होणार चौकशी
स्वाती मालीवाल प्रकरणात केजरीवाल गप्प का?, गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांचा सवाल
 केजरीवालांच्या वाढत्या अडचणींमुळे काँग्रेसला आनंदाच्या उकळ्या