हैदराबादला तिसरा धक्का; एडन मार्कराम आऊट

पुढारी ऑनलाईन डेस्क : एडन मार्करामच्या रुपाने बोल्टने हैदराबादला तिसरा धक्का दिला आहे. नव्याने फलंदाजीसाठी आलेला  मार्कराम एकच धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. राजस्थानचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने  एकापाठोपाठ एक अशा तीन विकेट्स घेतल्या. हेनरिक क्लासेन व ट्रॅव्हिस हेड ही जोडी आता क्रेजवर आहे. हैदराबादला दुसरा धक्का; राहुल त्रिपाठी आऊट सलामीवीर अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर राहुल …

हैदराबादला तिसरा धक्का; एडन मार्कराम आऊट

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : एडन मार्करामच्या रुपाने बोल्टने हैदराबादला तिसरा धक्का दिला आहे. नव्याने फलंदाजीसाठी आलेला  मार्कराम एकच धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. राजस्थानचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने  एकापाठोपाठ एक अशा तीन विकेट्स घेतल्या. हेनरिक क्लासेन व ट्रॅव्हिस हेड ही जोडी आता क्रेजवर आहे.
हैदराबादला दुसरा धक्का; राहुल त्रिपाठी आऊट
सलामीवीर अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर राहुल त्रिपाठीने खेळ सावरला मात्र ट्रेंट बोल्टने त्याला ३७ धावांवर बाद केले.
हैदराबादला पहिला धक्का; अभिषेक शर्मा बाद 
ट्रेंट बोल्टने अभिषेक शर्माला बाद करून सनरायझर्स हैदराबादला पहिला धक्का दिला. पाच चेंडूत १२ धावा करून अभिषेक बाद झाला.
नाणेफेक जिंकून राजस्थानचा गोलंदाजीचा निर्णय
IPL 2024  क्वालिफायर-2 चा आजचा सामना  सनरायझर्स हैदराबाद  विरुद्ध राजस्थान रॉयल्सशी होत आहे. हा सामना चेन्नई येथील एमए चिदंबरम स्टेडियमवर होत आहे. सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून हा सामना जो संघ जिंकेल, तो थेट अंतिम फेरीत पोहोचेल. त्यांचा सामना 26 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे. या सामन्यात राजस्थानने संघात कोणताही बदल केला नाही. मात्र, हैदराबादच्या संघात विजयकांत व्यासकांतची जागा एडन मार्करामने घेतली आहे.
राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, टॉम कोहलर कॅडमोर, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रायन पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल. इम्पॅक्ट सब: शिमरॉन हेटमायर, नांद्रे बर्जर, शुभम दुबे, डेनोवन फरेरा, कुलदीप सेन.
सनरायझर्स हैदराबाद : ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, पॅट कमिन्स (क), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी. नटराजन. इम्पॅक्ट सब: उमरान मलिक, सनवीर सिंग, ग्लेन फिलिप्स, मयंक मार्कंडे, शाहबाज अहमद

All to play for in Chennai! 🏟️
The two Captains are #Qualifier2 ready 🤜🤛
Are you? 😉
Follow the Match ▶️ https://t.co/Oulcd2G2zx… #TATAIPL | #SRHvRR | #TheFinalCall pic.twitter.com/kzwFYfl9OJ
— IndianPremierLeague (@IPL) May 24, 2024