पुणे : वडगाव आनंद येथील नारळाच्या झाडावरील बिबट्या कॅमेऱ्यात कैद

आळेफाटा; पुढारी वृत्तसेवा : बिबट्याचे नेहमी दर्शन होत असलेल्या वडगाव आनंद (ता. जुन्नर) परिसरातील चौगुलेवस्ती येथे शुक्रवारी (दि.२४) सकाळी आठच्या सुमारास बिबट्या शेतातील नारळाचे झाडावर चढताना व उतरतानाचा थरार शेतकऱ्यांने आपल्या मोबाईलमध्ये केला आहे. आळेफाटा, वडगाव आनंद, आळे परिसरात बिबट्याचा मोठा वावर आहे. बिबट्याचे ठिकठिकाणी दर्शन नागरिकांना होत आहे. शुक्रवारी (दि.२४) सकाळीच्या सुमारास चौगुलेवस्ती परिसरातील …

पुणे : वडगाव आनंद येथील नारळाच्या झाडावरील बिबट्या कॅमेऱ्यात कैद

आळेफाटा; Bharat Live News Media वृत्तसेवा : बिबट्याचे नेहमी दर्शन होत असलेल्या वडगाव आनंद (ता. जुन्नर) परिसरातील चौगुलेवस्ती येथे शुक्रवारी (दि.२४) सकाळी आठच्या सुमारास बिबट्या शेतातील नारळाचे झाडावर चढताना व उतरतानाचा थरार शेतकऱ्यांने आपल्या मोबाईलमध्ये केला आहे.
आळेफाटा, वडगाव आनंद, आळे परिसरात बिबट्याचा मोठा वावर आहे. बिबट्याचे ठिकठिकाणी दर्शन नागरिकांना होत आहे. शुक्रवारी (दि.२४) सकाळीच्या सुमारास चौगुलेवस्ती परिसरातील राजाराम बाबुराव चौगुले यांच्या शेतातील नारळाच्या झाडावर बिबट्या चपळाईने २० फुटापर्यंत गेला त्यांनतर काही वेळातच खाली उतरून शेजारील उसाचे शेतात गेला. या घटनेने त्या परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. बिबट्याच्या या हालचालींचा थरार तेथील शेतकऱ्यांच्या मोबाईल कॅमेऱ्या मध्ये कैद झाला आहे. या परिसरात तातडीने पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने केल्यानंतर या ठिकाणी पिंजरा लावणार असल्याची माहिती आळे वनपरिक्षेत्र वनपाल संतोष साळुंखे यांनी दिली.
हेही वाचा : 

Jalgaon News | ज्यादा दराने कापूस बियाणे विक्री- डमी ग्राहक पाठवून पथकाने रंगेहाथ पकडलं
Dombivli MIDC Blast | डोंबिवली बॉयलर स्फोट : गुन्हा नोंद, कंपनीचा मालक फरार
Nashik Devla Handa Morcha | पाण्यासाठी महिलांचा हंडा मोर्चा, ग्रामपंचायतीला ठाेकले टाळे