गोंदियात मित्रानेच केला मित्राचा खून

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून मित्रानेच आपल्या मित्राचा धारदार शस्त्राने खून केला. ही घटना गुरूवारी (दि. २३) रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास शहरातील छोटा गोंदिया/ गोविंदपूर परिसरातील जितेश चौकात घडली. राहुल दिलीप बिसेन (वय २२, रा. शास्त्री वार्ड, गोंदिया) असे मृत युवकाचे तर प्रतीक उर्फ सोनू सुनील भोयर (वय २३, रा. जितेश …

गोंदियात मित्रानेच केला मित्राचा खून

गोंदिया, Bharat Live News Media वृत्तसेवा : किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून मित्रानेच आपल्या मित्राचा धारदार शस्त्राने खून केला. ही घटना गुरूवारी (दि. २३) रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास शहरातील छोटा गोंदिया/ गोविंदपूर परिसरातील जितेश चौकात घडली. राहुल दिलीप बिसेन (वय २२, रा. शास्त्री वार्ड, गोंदिया) असे मृत युवकाचे तर प्रतीक उर्फ सोनू सुनील भोयर (वय २३, रा. जितेश चौक, गोंदिया) असे आरोपी मित्राचे नाव आहे.
राहुल व सोनू हे दोघेही चांगले मित्र होते. काल गुरूवारी जितेश चौक परिसरात दोघांमध्ये काही किरकोळ कारणावरून कडाक्याचा वाद झाला. यात सोनूचा राग अनावर झाल्याने त्याने धारदार चाकूने राहुलच्या पोटात, छाती व खांद्यावर सपासप वार करुन त्याचा खून केला. यानंतर सोनू घटनास्थळावरुन पसार झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बनकर, शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम व त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देवून तेछील पंचनामा केला. याप्रकरणी फिर्यादी दिलीप जीवनलाल बिसेन (वय ४५ रा. शास्त्री वार्ड) यांच्यावरून गोंदिया शहर पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक वानखेडे करीत आहेत.
हेही वाचा

Srinivas Kulkarni| कोल्हापूरच्या सुपुत्राचा अमेरिकेत डंका; श्रीनिवास कुलकर्णी यांना खगोल शास्त्रातील ‘शॉ’ पुरस्कार
Lok Sabha Election : दिल्लीतील लढत ठरवणार विधानसभेची दिशा
Dombivli MIDC Blast : डोंबिवलीतील दुर्घटनेला कंपनी व्यवस्थापन जबाबदार : अंबादास दानवे