मुंबई : लैला खान हत्याकांड; लैलाच्या सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा
मुंबई : Bharat Live News Media वृत्तसेवा बॉलीवूड अभिनेत्री लैला खान व तिच्या कुटुंबातील पाच जणांच्या हत्याकांड प्रकरणात दोषी ठरविण्यात आलेल्या परवेझला अखेर सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षाने हे दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण असल्याने आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आज (शुक्रवार) न्यायालयाकडे केली होती.
इगतपुरी येथील फार्म हाऊसच्या आवारात बॉलीवूड अभिनेत्री लैला खान, तिची आई सेलिना व चार भावंडांची हत्या झाली. हे फेब्रुवारी 2011 मध्ये उघडकीस आलेे.
जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी परवेज याला अटक केल्यावर काही महिन्यांनंतर लैला आणि तिच्या कुटुंबीयांचे हत्याकांड उघडकीस आले. तसेच, त्यांचे कुजलेले मृतदेह बंगल्यातून बाहेर काढण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी परवेज याच्याविरूद्ध ४० साक्षीदार तपासले. गेल्या आठवड्यात आरोपी परवेझला दोषी ठरवले.
हेही वाचा :
हनी ट्रॅप…हत्या…मृतदेहाचे तुकडे : बांगलादेश खासदार हत्या प्रकरणाला नवे वळण
Maharashtra MLC Election | पदवीधर, शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीची नवीन तारीख जाहीर
बलात्कारातून जन्मलेल्या मुलाने तब्बल ३० वर्षांनी आईला मिळवून दिला ‘न्याय’!