जळगाव : उष्माघातामुळे भाजीविक्रेत्या महिलेचा मृत्यू

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – धरणगाव येथे भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या 75 वर्षीय महिलेचा उष्माघातामुळे धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरूअसताना मृत्यू झाला. ही घटना गुरुवार (दि.२३) रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. धरणगाव पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. नागरिकांमध्ये उष्माघाताचा बळी म्हटले जात होता. मात्र डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांचे बीपी कमी झाल्यामुळे व त्यांनी …

जळगाव : उष्माघातामुळे भाजीविक्रेत्या महिलेचा मृत्यू

जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा – धरणगाव येथे भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या 75 वर्षीय महिलेचा उष्माघातामुळे धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरूअसताना मृत्यू झाला. ही घटना गुरुवार (दि.२३) रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. धरणगाव पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. नागरिकांमध्ये उष्माघाताचा बळी म्हटले जात होता. मात्र डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांचे बीपी कमी झाल्यामुळे व त्यांनी सकाळपासून काहीही खाल्ले किंवा पाणी घेतले नव्हते. त्यामुळे मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी सांगतात.
याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव शहरातील गौतम नगरमध्ये राहणाऱ्या भाजी विक्रेत्या महिला धुडकाबाई नथ्थू विसावे (वय ७५), या गुरुवार (दि.२३) रोजी बाजारात भाजी विक्री करत होत्या. दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास अचानक उष्णतेमुळे धुडकाबाई विसावे या चक्कर येऊन पडल्या. त्यानंतर त्यांना धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तेथे डॉ. जितेंद्र चव्हाण यांनी त्यांच्यावर उपचार केले. मात्र, त्यांची अधिकच प्रकृती खालावली अन् उपचार सुरु असतानाच धुडकाबाई विसावे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नागरिकांच्या म्हणण्यानुसार सदरील मृत्यू हा उष्णतेमुळे झालेला आहे. त्यामुळे नागरिकांकडून डॉक्टरांच्या अहवालावरुन संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, धुडकाबाई विसावे या ४० वर्षापासून कोट बाजारात भाजी विक्रीचे काम करत होत्या. धरणगाव ग्रामीण रुग्णालयात मे हिट सुरु असला तरी उष्माघात कक्ष सुरु करण्यात आलेला आहे. त्यामध्ये कुलर आहे. ए सी मागणी करुनही उन्हाळा संपत आला तरी अजून आलेला नाही असे डॉ जितेंद्र चव्हाण यांनी माहिती दिली.
हेही वाचा:

Dombivali boiler blast | डोंबिवली बॉयलर स्फोट प्रकरण, कंपनीच्या मालकावर गुन्हा
Singham Again : रुबाबदार..तडफदार अजय देवगनचा पहिला सिंघम लूक समोर