दुर्दैवी ! ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलेटर दाबल्याने जीव गेला!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : टेम्पो पुढे घेण्यास सांगितल्यानंतर टेम्पोचालकाने घाई गडबडीत ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलेटरवर पाय दिल्याने एकाचा सिक्युरिटी केबिन आणि टेम्पो यांच्यामध्ये दबून मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खासगी कंपनीच्या आवारात कामानिमित्त गेलेल्या तरुणाला टेम्पोने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावरील बकोरी परिसरात घडली. अंकित बबन शिवले (वय 28, रा. पिंपळे … The post दुर्दैवी ! ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलेटर दाबल्याने जीव गेला! appeared first on पुढारी.
#image_title

दुर्दैवी ! ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलेटर दाबल्याने जीव गेला!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : टेम्पो पुढे घेण्यास सांगितल्यानंतर टेम्पोचालकाने घाई गडबडीत ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलेटरवर पाय दिल्याने एकाचा सिक्युरिटी केबिन आणि टेम्पो यांच्यामध्ये दबून मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खासगी कंपनीच्या आवारात कामानिमित्त गेलेल्या तरुणाला टेम्पोने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावरील बकोरी परिसरात घडली.
अंकित बबन शिवले (वय 28, रा. पिंपळे जगताप रस्ता, शिवलेवस्ती, वढू बुद्रुक, ता. शिरूर) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याबाबत अंकुश शिवले (वय 43) यांनी या संदर्भात लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अंंकित हा नगर रस्त्यावरील बकोरी भागात असलेल्या वेकफिल्ड कंपनीत कामानिमित्त गेला होता. त्या वेळी सुरक्षारक्षकाच्या केबिनजवळ भरधाव टेम्पोने अंकितला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या अंकितला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस कर्मचारी शिंदे तपास करत आहेत.
हेही वाचा
Pune Drugs Case : ललित पाटील याला मदत करणारे तिघे अटकेत
एकटेपणा हा रोज पंधरा सिगारेट ओढण्याइतकाच घातक!
Pune News : फायनान्स कंपन्यांची सावकारी फोफावली !
The post दुर्दैवी ! ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलेटर दाबल्याने जीव गेला! appeared first on पुढारी.

पुणे : पुढारी वृत्तसेवा : टेम्पो पुढे घेण्यास सांगितल्यानंतर टेम्पोचालकाने घाई गडबडीत ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलेटरवर पाय दिल्याने एकाचा सिक्युरिटी केबिन आणि टेम्पो यांच्यामध्ये दबून मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खासगी कंपनीच्या आवारात कामानिमित्त गेलेल्या तरुणाला टेम्पोने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावरील बकोरी परिसरात घडली. अंकित बबन शिवले (वय 28, रा. पिंपळे …

The post दुर्दैवी ! ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलेटर दाबल्याने जीव गेला! appeared first on पुढारी.

Go to Source