वैष्णोदेवीला जाणाऱ्या बसची ट्रकला धडक, ७ भाविकांचा मृत्यू

हरियाणा ; पुढारी ऑनलाईन  अंबाला-दिल्ली-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या बस अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून, 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींवर अंबाला कॅन्टच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दोन वाहनांची जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, बस आणि ट्रक या दोन्हीही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. मिळालेल्या …

वैष्णोदेवीला जाणाऱ्या बसची ट्रकला धडक, ७ भाविकांचा मृत्यू

हरियाणा ; Bharat Live News Media ऑनलाईन  अंबाला-दिल्ली-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या बस अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून, 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींवर अंबाला कॅन्टच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दोन वाहनांची जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, बस आणि ट्रक या दोन्हीही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅव्हलरमध्ये बसलेले लोक वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जात होते.
जोरदार धडक बसल्याने वाहनांचे पूर्ण नुकसान झाले. यावेळी जखमी लोक वाहनांच्या आतच अडकून पडले. रस्त्याने जाणाऱ्यांनी कसेबसे जखमींना गाडीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढले, त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्रवाशांच्या लोकांच्या मदतीने जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल केले. 
भाविक वैष्णोदेवीला जात होते
मिळालेल्या माहितीनुसार, अंबाला-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. जिथे एका ट्रॅव्हल्सला (मिनी बस) ट्रकची धडक बसली. या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला तर २० हून अधिक जण जखमी झाले. सर्व भाविक जम्मूतील कटरा वैष्णोदेवीला जात होते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस व रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी पोहोचली व जखमींना अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवले.

Haryana | Seven people died and more than 20 people were injured in a bus accident on the Ambala-Delhi-Jammu National Highway: Dr. Kaushal Kumar, Civil Hospital, Ambala Cantt https://t.co/Iu332pIKq4 pic.twitter.com/6JcaJ4gxSv
— ANI (@ANI) May 24, 2024

हेही वाचा : 

राजस्थानात 10 शहरांचे तापमान 45 अंशांच्याही पुढे

डोंबिवलीच्या रसायन कारखान्यात स्फोट 8 कामगारांचा होरपळून मृत्यू, 60 जखमी

high blood pressure : उच्च रक्तदाबाचे आव्हान