बुद्ध जयंतीनिमित्त 2 हजार 586 किलोची खीर करण्याचा विश्वविक्रम
नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : गौतम बुद्धांच्या 2586व्या जयंती निमित्त नागपूरमध्ये 2586 किलोची खीर करण्यात आली होतीय या खीरीमध्ये 100 किलो तुप, 2000 लिटर दूध, 1000 किलो साखर, 400 किलो तुकडा तांदूळ घालून त्यात वरून चारोळी, बदाम, काजू, मनुका, खोबरा किस या पौष्टिक पदार्थांचा वापर करीत विक्रमी खीर तयार करण्यात आली. तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या जयंतीचे औचित्य साधून चक्रवर्ती सम्राट अशोक फाउंडेशन आणि भीम वादळ संस्थेच्या पुढाकाराने विश्वविक्रमाची नोंद झाल्याची माहिती मनीष पाटील यांनी दिली.
उत्तर नागपुरातील बेझनबाग पटांगणावर सायंकाळी 5 वाजता ही खीर तयार करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला. दोन भल्या मोठ्या शेगडीवर 1 टन लाकडाचा वापर करून अग्नी प्रज्वलित करण्यात आला होता. दोन शेगडीवर तीन टन वजनाची मोठी काई ठेवण्यात आली होती. यावेळी राज्यभरातून आलेले सुमारे ५०० भिख्खू उपस्थित होते. त्यांनी पटांगणावर महापरित्रणपाठ तसेच, बौद्ध धर्मातील सर्व सुत्ताचे पठण केले. महापरित्राणपाठ समाप्तीनंतर हा प्रसाद उपस्थित बौद्ध उपासकांना देण्यात आला, अशी माहिती आयोजन समिती प्रमुख प्रतिक इंदूरकर यांनी दिली.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणेश चाचेरकर, जितू बनसोड, मनिष पाटील, रवींद्र ठवरे, विनित वाघमारे, उद्देश भिवगडे, बाबू खान, अंशुल खोब्रागडे, निखिल वानखेडे, राकेश निकोसे, उपदेश भिवगडे निखिल जावदे सुनेना जांभुळकर , करुणा अंडर सहारे व मित्र परिवार उपस्थित होते.
हेही वाचा :
सिंधुदुर्ग : केदारनाथ येथे दरड कोसळून भांडेगाव येथील भाविकाचा मृत्यू
Malaysia Masters : पीव्ही सिंधूची वुमन्स सिंगलच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक
नागभीड तालुक्यात बोगस बंगाली डॉक्टरला अटक