Health is the real wealth : चांगल्या आरोग्यासाठी दहा टिप्स!
चांगले आरोग्य किती महत्त्वाचे आहे, Health is the real wealth हे कोरोना काळात जगभरातील लोकांना प्रकर्षाने कळून चुकले. आरोग्य चांगले नसेल, तर भरपूर संपत्ती किंवा नातेवाईकांचा गोतावळाही काही कामाचा नसतो! आरोग्य हीच खरी संपत्ती आहे.
आरोग्यामध्ये शारीरिक व मानसिक अशा दोन्ही प्रकारच्या आरोग्याचा समावेश होतो. Health is the real wealth ते चांगले ठेवण्यासाठी तज्ज्ञांनी दिलेल्या या दहा टिप्स…
* दररोज अगदी न चुकता मोकळ्या हवेत किमान दहा मिनिटे तरी चाला आणि ते ही उत्साहाने-आनंदाने.
* दररोज किमान दहा मिनिटे स्वत:साठी द्या. दहा मिनिटे स्वत:च्याच सहवासात राहा. एका जागी शांत, स्वस्थ बसा.
* दररोज 6 ते 8 तास शांत झोप घ्या. लक्षात ठेवा शांत झोप म्हणजे शरीर आणि मन दोघांनाही पूर्ण विश्रांती. ती आवश्यकच आहे.
* दररोज थोडा वेळ तरी खेळा. शक्य असेल तर मुलांमध्ये मूल होऊन खेळा.
* दररोज भरपूर पाणी प्या. पाणी म्हणजे जीवन हे लक्षात ठेवा.
* दररोज थोडे तरी वाचन करा.
* ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत, ज्यावर आपले नियंत्रण नाही त्यांची चिंता करणे सोडून द्या.
* भूतकाळातील अप्रिय घटना विसरून जा. त्यांनी मनस्तापाशिवाय काहीही मिळत नाही.
* दर वेळी तुम्हीच कसे जिंकणार? जीवनात हार-जीत हसतमुखाने स्वीकारायला शिका.
* दररोज ठरावीक वेळी ध्यानधारणा करा, प्रार्थना करा. तो मन:शांतीचा मार्ग आहे.
The post Health is the real wealth : चांगल्या आरोग्यासाठी दहा टिप्स! appeared first on पुढारी.
चांगले आरोग्य किती महत्त्वाचे आहे, Health is the real wealth हे कोरोना काळात जगभरातील लोकांना प्रकर्षाने कळून चुकले. आरोग्य चांगले नसेल, तर भरपूर संपत्ती किंवा नातेवाईकांचा गोतावळाही काही कामाचा नसतो! आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. आरोग्यामध्ये शारीरिक व मानसिक अशा दोन्ही प्रकारच्या आरोग्याचा समावेश होतो. Health is the real wealth ते चांगले ठेवण्यासाठी तज्ज्ञांनी दिलेल्या …
The post Health is the real wealth : चांगल्या आरोग्यासाठी दहा टिप्स! appeared first on पुढारी.