डोंबिवलीतील केमिकल कंपनी भीषण स्फोट; ४ जण ठार
डोंबिवली : Bharat Live News Media वृत्तसेवा : अनुदान केमिकल कंपनी एमआयडीसी फेज २ मध्ये आहे. या कंपनीत दोनच्या सुमारास बॉयलरचे लागोपाठ चार – पाच स्फोट झाले. या स्फोटामध्ये ४ जण ठार झाले असून संपूर्ण कंपनी बेचराख झाली. धूर आणि आगीचे लोळ यामुळे फायर ब्रिगेडला कंपनीत शिरता आले नाही. त्यामुळे या कंपनीत जीवितहानी झाली आहे का याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.
या स्फोटामुळे कंपनीच्या शक्तिशाली स्फोटाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. स्फोटाची माहिती कळताच घटनास्थळी अग्निशामक दलाचे सात ते आठ बंब दाखल झाले आहेत. सुरुवातीला अग्निशामक दलाच्या जवानांना कंपनीपर्यंत पोहोचता येत नव्हते. त्यातच बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी बघ्यांना तेथून हुसकावून लावल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांना आग विझविण्याचा कामास सोयीस्कर झाले.
याच परिसरातील प्रोबेस कंपनीत २६ मे २०१६ रोजी झालेल्या स्फोटात १२ जण मृत्युमुखी पडले होते, तर २१५ जण जखमी झाले होते. प्रोबेस कंपनीतील स्फोटाला येत्या २६ मे रोजी ८ वर्षे पूर्ण होणार आहेत. अगदी अशाच स्वरूपाच्या शक्तिशाली स्फोटात अनुदान केमिकल कंपनी बेचिराख झाली. लागोपाठ एका मागोमाग एक कानठळ्या बसवणाऱ्या स्फोटांमुळे आसपासचा परिसर हादरला होता. या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांच्या घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. परिसरातील रहिवासी भयभित होऊन घराबाहेर पडले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिसर सील केला. घटनास्थळी चार-पाच ॲम्बुलन्स दाखल झाल्या आहेत. मात्र कंपनीत भडकलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्नीशामक दलाच्या जवानांना अद्याप यश आलेले नाही. कंपनीमध्ये नेमके किती जण अडकले आहेत? ही आग नेमकी कशामुळे लागली याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.
हेही वाचा :
बंगळूरमधील ३ हॉटेल्सना बॉम्बची धमकी, तपास सुरु
धुळे राज्य आपत्ती प्रतिसाद दलातील तिघांचा मृत्यू
नाशिक : सिडको – इंद्रनगरी परिसरातील रस्त्यांचे काम निष्कृष्ट दर्जाचे : बडगुजर