मार्केटमध्ये बहार, गुंतवणूकदारांना ४.१५ लाख कोटींची लॉटरी

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीने (Nifty) गुरुवारी (दि. २३) नवा विक्रमी उच्चांक नोंदवला. आजच्या ट्रेडिंग सेन्सेक्स ७५,५०० जवळ गेला. तर निफ्टीने २२,९९३ च्या नव्या उच्चांकाला स्पर्श केला. त्यानंतर सेन्सेक्स १,१९६ अंकांनी वाढून ७५,४१८ वर बंद झाला. तर निफ्टी ३६९ अंकांच्या वाढीसह २२,९६७ वर स्थिरावला. सेन्सेक्स आणि निफ्टी प्रत्येकी १.६ …

मार्केटमध्ये बहार, गुंतवणूकदारांना ४.१५ लाख कोटींची लॉटरी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीने (Nifty) गुरुवारी (दि. २३) नवा विक्रमी उच्चांक नोंदवला. आजच्या ट्रेडिंग सेन्सेक्स ७५,५०० जवळ गेला. तर निफ्टीने २२,९९३ च्या नव्या उच्चांकाला स्पर्श केला. त्यानंतर सेन्सेक्स १,१९६ अंकांनी वाढून ७५,४१८ वर बंद झाला. तर निफ्टी ३६९ अंकांच्या वाढीसह २२,९६७ वर स्थिरावला. सेन्सेक्स आणि निफ्टी प्रत्येकी १.६ टक्क्यांनी वाढले. आज आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी राहिली.
दरम्यान, बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.५ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.३ टक्क्यांनी वाढून बंद झाला. तर मेटल आणि फार्मा वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. ऑटो, बँक आणि कॅपिटल गुड्स प्रत्येकी २ टक्क्यांनी वाढले.
गुंतवणूकदारांना ४.१५ लाख कोटींचा फायदा
बाजारातील आजच्या विक्रमी तेजीमुळे बीएसईवरील सूचीबद्ध सर्व कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल सुमारे ४.१५ लाख कोटींनी वाढून ४२१ लाख कोटी रुपयांवर गेले.
बाजारातील ठळक घडामोडी

आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स तब्बल १,२०० अंकांनी वाढला
निफ्टी १.६४ टक्क्यांनी वाढून बंद
निफ्टी बँक निर्देशांक २ टक्क्यांनी वाढला
निफ्टीवर अदानी एंटरप्रायजेसचा शेअर्स ८ टक्क्यांनी, अदानी पोर्ट्स ४ टक्क्यांनी वाढला

सेन्सेक्स- निफ्टी तेजीचे कारण काय?
चौथ्या तिमाहीतील कमाईचे अंदाज, आरबीआयने जाहीर केलेला विक्रमी लाभांश आणि निवडणुकीबद्दल वाढलेली निश्चितता यामुळे शेअर बाजारात तेजीचा माहौल परतला असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. बाजारातील तेजीला लार्जकॅप आयटी आणि बँकिंग शेअर्समधील खरेदीने हातभार लावला.
शेअर बाजारात जोरदार रिकव्हरी
जागतिक कमकुवत संकेतांदरम्यान देशांतर्गत बाजाराने गुरुवारी सपाट सुरुवात केली होती. त्यानंतर बाजारात जोरदार रिकव्हरी दिसून आली. सेन्सेक्सने आजच्या ट्रेडिंग सत्रात ७५,४९९ अंकाला स्पर्श केला. तर २२,९९० पार झाला.
सेन्सेक्सवरील टॉप गेनर्स
सेन्सेक्सवर एलटी, एम अँड एम, मारुती, ॲक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट, इंडसइंड बँक, टायटन, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, भारती एअरटेल, टाटा मोटर्स हे शेअर्स १ ते ४ टक्क्यांपर्यंत वाढून टॉप गेनर्स राहिले. तर सन फार्मा, पॉवर ग्रिड, एनटीपीसी या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
Sensex closing
अदानींच्या शेअर्सची रॉकेट भरारी
निफ्टीवर अदानी एंटरप्रायजेसचा शेअर्स तब्बल ७ टक्क्यांनी वाढून ३,३८३ रुपयांवर पोहोचला. तर अदानी पोर्ट्सचा शेअर्स ४ टक्के वाढीसह १,४३९ रुपयांपर्यंत गेला. एलटी, ॲक्सिस बँक, एम अँड एम हेही प्रत्येकी ३ टक्क्यांनी वाढले. तर सन फार्मा, पॉवर ग्रिड, हिंदाल्को हे शेअर्स घसरले.
बँक निफ्टीही तेजीत
निफ्टी बँक आज २ टक्क्यांनी वाढून ४८,८०० वर पोहोचला. निफ्टी बँकवर ॲक्सिस बँक, बंधन बँक, AU Small Finance बँक, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक हे शेअर्स २ ते ३.५ टक्क्यांनी वाढले. निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस २ टक्क्यांनी वाढून २१,७४० पार झाला.
RBI चा विक्रमी लाभांश
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) केंद्रीय संचालक मंडळाने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी सरकारला अतिरिक्त म्हणून २.११ लाख कोटी रुपये लाभांश हस्तांतरित करण्यास मंजुरा दिली, असे आरबीआयने २२ मे रोजी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. आरबीआयने मंजुरी दिलेला विक्रमी २.११ लाख कोटींचा लाभांश सरकारला वित्तीय तूट कमी करण्यास मदत करेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
पीएम मोदींचा मोठा दावा
लोकसभा निवडणूक निकाल जाहीर होईल त्या दिवशी म्हणजे ४ जून रोजी भाजप आणि शेअर बाजार दोन्ही नवीन उंची गाठतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. या निकालापूर्वीच शेअर बाजाराने नवा विक्रमी उच्चांक नोंदवला आहे. तसेच नुकताच बीएसई सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलाने ५ ट्रिलियन डॉलरचा टप्पा पार केला आहे.
हे ही वाचा :

कोण आहेत दुसरे सर्वाधिक पगार घेणारे CEO निकेश अरोरा?
बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप ५ ट्रिलियन डॉलरवर