गोंदिया: भरधाव ट्रकची एलसीबीच्या वाहनासह तीन वाहनांना धडक : एक ठार

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : मालवाहू ट्रक चालकाने आपले वाहन भरधाव वेगात चालवून एसटी बस, ट्रक व त्यानंतर पोलीस वाहनाला जबर धडक दिल्याची घटना काल (दि. २२मे) सकाळी ११. १५ वाजताच्या सुमारास शहरातील रिंगरोड परिसरात घडली. या विचित्र अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला. तर स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचाऱ्यांसह चारजण गंभीर जखमी झाले. …

गोंदिया: भरधाव ट्रकची एलसीबीच्या वाहनासह तीन वाहनांना धडक : एक ठार

गोंदिया, Bharat Live News Media वृत्तसेवा : मालवाहू ट्रक चालकाने आपले वाहन भरधाव वेगात चालवून एसटी बस, ट्रक व त्यानंतर पोलीस वाहनाला जबर धडक दिल्याची घटना काल (दि. २२मे) सकाळी ११. १५ वाजताच्या सुमारास शहरातील रिंगरोड परिसरात घडली. या विचित्र अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला. तर स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचाऱ्यांसह चारजण गंभीर जखमी झाले.

साहिल कुडमेते (रा. चंद्रपूर) असे मृत युवकाचे नाव आहे. पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, वाहन चालक मुरलीधर पांडे (रा. गोंदिया), आकाश गावतुरे (रा. वडसा), पियुष टेंभुर्णी (रा. चंद्रपूर) अशी जखमींची नावे आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील सहयोग हॉस्पिटल, अवंती चौक परिसर ते रेल्वे क्रॉसींग दरम्यान आरोपी आयसर ट्रक चालकाने आपल्या ताब्यातील वाहन अत्यंत भरधाव वेगाने चालवत होता. दरम्यान समोरील परिसरात एका एसटी बसला धडक दिली. ज्यामध्ये बरेचसे नुकसान झाले. यानंतर सदर ट्रकने समोरील ट्रकलाही धडक दिली. तर आणखी पुढे जात रेल्वे क्रॉसींग द्वारका लॉन समोरील स्पीड ब्रेकरवर पोलीस वाहनासही जोरदार धडक दिली. ज्यामध्ये पोलीस वाहन उडून परत जागेवरच ते स्थिर झाले. यामध्ये पोलीस निरीक्षक दिनेश लबडे व वाहन चालक मुरलीधर पांडे हे गंभीर जखमी झाले आहेत.

या विचित्र भिषण अपघातात ४ ते ५ वाहने एकमेकांना धडकल्याने दुचाकीस्वार साहिल कुडमेते या युवकाचा मृत्यू झाला. तर इतर दोघे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. सदर वाहन चालकाविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला असून, सर्व जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.