बंगळूरमधील ३ हॉटेल्सना बॉम्बची धमकी, तपास सुरु
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बंगळूर शहरातील द ओटेरासह ३ नामांकित हॉटेलांना बॉम्बची धमकी देणारा मेल पाठवण्यात आला आहे. यानंतर बॉम्बशोधक पथक आणि पोलिसांचे पथक द ओटेरा हॉटेलमध्ये पोहोचले, अशी माहिती दक्षिण पूर्व बंगळूरचे डीसीपी यांनी दिली आहे.
पहाटे २ च्या सुमारास बॉम्बची धमकी देणारे ईमेल्स हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना आढळून आले. याची माहिती त्यांच्याकडून तत्काळ पोलिसांना देण्यात आली. यानंतर ओटेरा हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला असून बॉम्बशोधक पथक परिसराची कसून तपासणी करत आहेत.
१४ मे रोजी बंगळूरच्या वेगवेगळ्या भागांतील किमान आठ शाळांना बॉम्बची धमकी देणारा ईमेल मिळाला होता. पण नंतर ही अफवा निघाली.
Bengaluru | A bomb threat mail was sent to three reputed hotels including The Oterra in the city. Teams of Bomb Squad and Police are currently at The Oterra hotel: DCP South East Bengaluru
— ANI (@ANI) May 23, 2024