थरारपट! पुणे रेल्वे स्थानकाच्या धोकादायक पादचारी पूलावर मनोरुग्ण चढला
पुणे : Bharat Live News Media : पुणे रेल्वे स्थानकाच्या एफओबीवर (फुट ओव्हर ब्रिज, पादचारी पूल) मनोरुग्ण चढला आहे, त्याला खाली उतरवण्याची कार्यवाही सुरू असून रेल्वे गाड्यांसाठी असलेल्या विद्युत तारांमुळे आणि खाली पडून अपघात होण्याची मोठी शक्यता आहे. मागील काही महिन्यांपूर्वी असाच एक मनोरुग्ण एका रेल्वे गाडीवर चढला होता त्यावेळी विद्युत तारांचा शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला होता. अशा मनोरुग्णांना रोखण्यासाठी रेल्वे कडून काय ठोस उपाययोजना केल्या जातात असा सवाल रेल्वे प्रवाशांकडून केला जात आहे.
ही घटना नव्याने उभारण्यात आलेल्या पादचारी पुलावर घडलेली आहे. या पुलाला लागूनच मेट्रोचे नवीन स्थानक आहे. त्यातून अथवा रेल्वेच्याच परिसरातून हा व्यक्ती वरती चढल्याची शंका व्यक्त केली जात आहे. याबाबत लोहमार्ग पोलीस अधिकारी म्हणाले, सदरील व्यक्तीला आमच्या कर्मचाऱ्यांकडून खाली उतरवण्यात आले असून, त्याची सखोल विचारपूस करण्यात येत आहे. या व्यक्तीकडून खाली उतरण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. त्याची चौकशी सुरू आहे मात्र सदरील व्यक्ती उडवा उडवीची उत्तर देत आहे.
हेही वाचा
पृथ्वीजवळून आज जाणार 845 फुटांचा लघुग्रह
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ यादिवशी ओटीटीवर पाहता येणार
कोरेगाव पार्क, मुंढव्यातील पबवर हातोडा; महापालिकेची कारवाई