भुसावळ तापले; रस्ते निर्मनुष्य : केळीच्या घडांनी टाकल्या माना
जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा – जळगाव जिल्ह्यामध्ये सध्या सूर्य आग ओकत आहे. दुपारनंतर तर घराच्या बाहेर पडणे अशक्य झालेले आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून पारा 44 ते 45 अंश सेल्सिअसदरम्यान स्थिरावला होता. मात्र तापमानाने बुधवारी (दि.२२) उच्चांकी गाठत पारा थेट ४७.१ गाठल्याने नागरिकांची सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत शहरातील रस्त्यांवर अघोषित संचारबंदी बघावयास मिळाली. तर जळगावमध्ये देखील सूर्यदेवतेचा कहर दिसून येत असून पारा ४५.३ गाठला होता.
वाढत्या उन्हाचे चटके व दाहकतेमुळे मानवी तसेच पशुपक्ष्यांच्या जीवनावर परिणाम होत आहे. धरण, तलावातील पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. याचा सर्वाधिक फटका केळी पिकांना बसला आहे. केळीचे घड माना टाकू लागले आहेत. जळगाव जिल्ह्यामध्ये तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या तापमानापासून जळगाव जिल्ह्याच्या नागरिकांची सुटका होईल, अशी कोणतीही चिन्हे दिसून येत नाही आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून सायंकाळी सहा-साडेसहापर्यंत उन्हाचे तीव्र चटके जाणवत आहे. दुपारी या वेळेत काम करणे जवळपास अशक्य होत आहे. त्यामुळे जागोजागी रस्ते ओस पडू लागले आहेत.
मामुराबाद हवामान केंद्रातर्फे आगाऊ अंदाज
दिनांक तापमान
22 मे 44 अंश
23 मे 45 अंश
24 मे 46 अंश
25 मे 44 अंश
26 मे 43 अंश
हेही वाचा:
Nashik Summer Heat | नाशिक शहराची नोंद हॉट शहरांच्या यादीत
Jalgaon Hotel Bhanu Murder News | हॉटेलात जुन्या वादातून तरुणाचा निर्घृण खून
Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | गुरूवार २३ मे २०२४